सिडकोने खारघर  येथे अनधिकृत बांधकामे तोडली

अविरत वाटचाल

पनवेल, 18 मे 2018:

सिडको किंवा महाराष्ट्र शासनाकडून कोणताही विकास परवाना न घेता बांधकाम करण्यात आलेल्या अनधिकृत बांधकामांवर आज सिडकोच्या अतिक्रमण विभागातर्फे कारवाई करण्यात आल्याची माहिती सिडको प्रशासनातर्फे देण्यात आली आहे.

या कारवाईचा तपशील पुढीलप्रमाणे :

  • खारघर, सेक्टर-10 येथील कोप्रा पुला जवळील अनधिकृत आरसीसी (जी+4) इमारतीचे चालू स्थितीतील बांधकाम अंशता तोडण्यात आले.

 

  • खारघर येथील सेक्टर-19 येथील भूखंड क्र. 265, 266 आणि 267 वर अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले तात्पुरत्या स्वरूपातील 7 व्यावसायिक गाळे, 12 झोपड्या, 1 धाबा तोडण्यात येवून 1600 चौ. मी. इतके क्षेत्र मुक्त करण्यात आले.

 

  • सेक्टर-35ई, खारघर येथील भूखंड क्र. 18 वर उभारण्यात आलेले भाजी विक्रीचे गाळे, भूखंड क्र. 67 वर उभारण्यात आलेले तात्पुरत्या स्वरूपातील गाळे आणि सामाजिक केंद्रासाठी राखीव असलेल्या भूखंड क्र. 55 वर उभारण्यात आलेले भाजी विक्रीचे गाळे; ही सर्व अनधिकृत अतिक्रमणे तोडण्यात आली आणि सुमारे 4000 चौ. मी. इतके क्षेत्र मुक्त करण्यात आले.

 

  • सेक्टर-19 मधील जरीमरी मंदिराच्या मागील बाजूस अनधिकृतरीत्या उभारण्यात आलेले पत्र्याचे तात्पुरत्या स्वरूपातील गोदाम तोडून सुमारे 200 चौ. मी. क्षेत्र मुक्त करण्यात आले.

वर उल्लेख केलेली अतिक्रमणे-अनधिकृत बांधकामे इ. सिडकोच्या मालकीच्या भूखंडांवर कोणत्याही प्रकारचा मालकी हक्क आणि विकासाची परवानगी नसताना उभारण्यात आली होती व सिडको प्रशासनाने योग्य ती कायदेशीर प्रकिया अवलंबून ही अतिक्रमणे निष्कासित केली.