पश्चिम किनारपट्टीला ‘सागर’ चक्रीवादळाचा इशारा

हवामान खात्याची पाच राज्यांना सूचना 

अविरत वाटचाल

नवी दिल्ली, 18 मे 2018 :

एडनच्या खाडीमध्ये तयार झालेल्या सागर या चक्रीवादळामुळे पश्चिम किना-यावरील महाराष्ट्र, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक, गोवा आणि लक्षद्विप या भागात हवामान खात्याने हाय अलर्ट जारी केला आहे. हे चक्रीवादळ येत्या 12 तासात आणखी तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे. सध्या हे चक्रीवादळ पश्चिमेला सरकत असून नंतर ते नैऋत्येकडे वळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एडनची खाडी, पश्चिम मध्य तसेच अरबी समुद्रात मच्छिमारांनी जाऊ नये असा इशारा दिला आहे.