ठाणे महापालिकेची  सिटी फ्री वाय फाय सेवा

अविरत वाटचाल न्यूज

ठाणे,18 जुलै 2018:

ठाणे महापालिकेतर्फे शहरात सार्वजनिक वाय-फाय सुविधेतंर्गत सुरू करण्यात आलेली  वाणिज्य वापर सुविधा आज सुरु करण्यात आली.

डिजिटल इंडिया आणि स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत नागरिकांना आता शहरात फ्री वायफाय सेवेचा लाभ घेता येणार आहे . शहरातील सर्व रस्ते वायफायशी जोडले असून पुढील 10 वर्षे ही सेवा शहरात कार्यरत असणार आहे . शहरात कोणत्याही ठिकाणी ठाणे सिटी फ्री वाय फाय या नावाने सुरू केलेले वाय फाय वापरता येणार आहे .

  • नागरिकांना आपल्या मोबाइलमध्ये लॉगीन करून या सेवेचा लाभ घेता येणार आहे .
  • या सेवेमध्ये 800Kbps स्पीडने अमर्यादीत फ्री वाय फाय वापरता येणार आहे.
  • ज्या नागरिकांना 800 kbps स्पीड पेक्षाही जास्त स्पीड ने wifi ची सेवा हवी आहे त्यांना अधिक मूल्य देवून माफक दारात 50 mbps स्पीडने ही सेवा वापरता येणार आहे.
  • या वायफाय सेवेमध्ये 10 रुपये पासून ते 400 रुपये पर्यत प्लॅन देण्यात आले आहेत.
  1. 10 रुपयेमध्ये 2 जीबी डाटा 1 दिवस
  2. 30 रुपयेमध्ये 5 जीबी 2 दिवस
  3. 50 रुपयेमध्ये 20 जीबी 7 दिवस
  4. 100 रुपयेमध्ये 45 जीबी 14 दिवस
  5. 150 रुपयेमध्ये 100 जीबी 28 दिवस
  6. 200 रुपयेमध्ये 150 जीबी 28 दिवस
  7. 300 रुपयेमध्ये 250 जीबी 28दिवस
  8. 400 रुपयेमध्ये 400 जीबी 56 दिवसाकरिता ही सेवा वापरता येणार आहे .

============================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

घोट नदीत कार कोसळल्यानंतरचा थरार