नवीन पनवेलमध्ये उद्या आरोग्य शिबिर

पनवेल, 25 जानेवारी 2017 /AV News Bureau:

प्रजासत्ताक दिनानिमित्त नवीन पनवेल, सेक्टर 17 मध्ये सकाळी 9 वाजता आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. भाजप जिल्हाध्यक्ष आ. प्रशांत ठाकूर यांच्याहस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

या शिबिरात मधूमेह, किडनी, त्वचा विकार, थायरॉइड, संधीवात, असिडिटी, हृदयरोग, स्रीरोग आदी आजारांवर तपासणी करण्यात येणार आहे.

हे आरोग्य शिबिर अस्मिता कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मित्र मंडळ, प्रियदर्शनी महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आणि आय.एम.सी. यांच्यावतीने आयोजित करण्यात आले आहे.