काबूल विमानतळावर 20 ते 30 रॉकेटचा हल्ला

काबूल, 27 सप्टेंबर 2017

अफगाणिस्तानची राजधानी असणा-या काबूल शहरातील हमीद करझाई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी सव्वा अकराच् सुमारास सुमारे 20 ते 30 रॉकेटनी हल्ला करण्यात आला. एकापाठोपाठ एक होणा-या रॉकेट हल्यांनी संपूर्ण काबूल शहर हादरले. मात्र कोणत्याही गटाने हल्लाची जबाबदारी स्वीकारली नाही.

अमेरिकेचे संरक्षण सचिव जेम्स मॅटीज अफगाण राजधानीत दाखल झाल्यानंतर अवघ्या काही वेळातच हे ह्ल्ले करण्यात आले. अचानक झालेल्या या हल्यामुळे प्रवाशांमध्ये प्रचंड धावपळ झाली. सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ रिकामे करण्यात आले.

या हल्ल्यात जिवितहानी झाली नसल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

नाटोचे प्रमुख जेन्स् स्टॉटलबर्ग हे मॅटिस, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील नाटो “ट्रेन आणि सहाय्य” यांच्याशी चर्चा करण्यासाठी राष्ट्रपती अशरफ गनी आणि इतर वरिष्ठ अधिकार्यांना भेटणार आहेत.