पर्यटन विकासासाठी जपानला साकडे

मुंबई, 28 मुंबई,2017/AV News Bureau:

महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्रासह पायाभूत सुविधा निर्मिती, तंत्रज्ञान, स्मार्ट सिटी आदी क्षेत्रामध्ये जपानने गुंतवणूक करावी, असे आवाहन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जपानच्या शिष्टमंडळाला केले.

जपानमधील वाकायामा शासनाच्या शिष्टमंडळाने आज पर्यटनमंत्र्यांची मंत्रालयात भेट घेतली. येत्या जानेवारी 2018 मध्ये वाकायामाचे गव्हर्नर भारतामध्ये तसेच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने विविध सामंजस्य करार होणार आहेत. या सामंजस्य करारामध्ये पर्यटन क्षेत्रातील वृद्धी, नाशिक शहराच्या अनुषंगाने शेती तसेच अन्न प्रक्रिया उद्योग, मेक इन महाराष्ट्र ला चालना देण्यासाठी जपानचे योगदान, राज्यातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूक,स्मार्ट सिटी प्रकल्प, विद्यार्थी आदान- प्रदान योजना आदींबाबत करार व्हावेत अशी अपेक्षा रावल यांनी व्यक्त केली.