गुरूवारी ठाण्यात पाणी नाही

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 23 एप्रिल 2024

 ठाणे महानगरपालिकेच्या उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरुन होणाऱ्या पाणी पुरवठा करणाऱ्या मुख्य वितरण वाहिनीचे स्थलांतर करुन मुख्य वितरण वाहिनीला जोडकाम के व्हिला नाला पुलाचे कामासाठी बाधित होत असल्याने करणे आवश्यक आहे. सदर कामे करणेसाठी पाणी पुरवठा विभागामार्फत गुरूवार, 25 एप्रिल  रोजी सकाळी 9 ते शुक्रवार , 26 एप्रिल रोजी सकाळी 9 वाजेपर्यत 24 तासाचा शटडाऊन घेण्यात येणार आहे. या कालावधीत उथळसर प्रभाग समिती जेल जलकुंभावरुन होणारा पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहणार आहे.

LATEST NEWS : आचारसंहिता नियमावलीचे उल्लंघन होणार नाही याकडे काटेकोर लक्ष द्या

सदर दिवशी उथळसर प्रभाग समिती क्षेत्रातील राबोडी क्र. 1 व 2, के व्हिला, आकाशगंगा, पंचगंगा, उथळसर, सेंट्रल जेल परिसर, पोलीस लाईन परिसर व नौपाडा प्रभाग क्षेत्रातील एन.के.टी. कॉलेज परिसर, खारकर आळी, पोलीस हायस्कूलच्या काही भागात  पाणीपुरवठा 24 तास पूर्णपणे बंद राहील.

LATEST STORY : मध्य रेल्वे – १७१ वर्षांचा अभूतपूर्व प्रवास

वरील शटडाऊनमुळे पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करुन ठेवावा व ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

========================================================

======================================================

========================================================