मेगाब्लॉकमुळे (12 ऑगस्ट) मेन, हार्बरचे वेळापत्रक बदलले

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 11 ऑगस्ट 2018:

रेल्वे मार्गाची देखभाल आणि इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेने उद्या 12 ऑगस्ट रोजी मेन आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक जाहीर केला आहे. या मेगाब्लॉकमुळे दोन्ही मार्गावरील गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे.

 

मुलुंड-माटुंगा अप जलद मार्गावर सकाळी 11.15 ते सायंकाळी 4.15 या काळात

  • कल्याडणहून सकाळी 10.37 ते दुपारी 3.56 या काळात अप जलद मार्गावर धावणाऱ्या सर्व उपनगरीय सेवा दिवा आणि परळ स्था नकांदरम्यायन धीम्याळ मार्गावर वळविण्याअत येतील. या गाड्या परळस्थािनकांपर्यंत सर्व स्थानकांवर थांबतील.  परळ स्थाानकापासून या गाड्या अप जलद मार्गावर वळविण्यात येतील.  या गाड्या आपल्या  निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनटे उशि‍रा शेवटच्या  स्थाकनकांवर पोहचतील.

 

  • सीएसएमटीहून सकाळी 10.05 ते दुपारी 3.22 या काळात जाणाऱ्या डाऊन मार्गावरील जलद गाड्या आपल्या निर्धारित थांब्यांव्यतिरिक्त  घाटकोपर, विक्रोळी, भांडुप मुलुंड आणि दिवा स्‍थानकावर थांबतील. या गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा 20 मिनटे उशि‍रा शेवटच्या स्थायनकांवर पोहचतील.

 

  • सीएसएमटी येथे सकाळी 11 ते सायंकाळी 6 या काळात येणाऱ्या आणि जाणाऱ्या डाऊन तसेच अप मार्गावरील धीम्या  गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनटे उशिरा पोहचतील.

 

  • मेगाब्लॉाक काळात दादर/छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे आगमन होणा-या सर्व मेल/एक्सेप्रेस गाड्या मुलुंड व माटुंगा स्थानकादरम्यान अप स्लो लाइन मार्गे धावतील व आपल्या  गंतव्य  स्थानंकावर 20 मिनटे उशिरा पोहचतील.

 

लांब पल्ल्याच्या गाड्यांचे वेळापत्रक

  1. 50104 रत्नाेगिरी-दादर पॅसेंजर गाडी सेवा दिवा स्थानकावर समाप्त  करण्या‍त येईल आणि 50103 दादर-रत्नाळगिरी पॅसेंजर गाडी दिवा स्थानकातून सुटेल. 
  2. 50103 गाडीच्या‍ प्रवाशांसाठी दादर ते दिवा विशेष उपनगरीय गाडी चालविण्याीत येईल जी दादरहून 3.40 वाजता सुटेल आणि ठाणे स्थािनकावर 4.06 वाजता पोहचेल आणि 4.13 वाजता दिवा स्थानकावर पोहचेल.

 

कुर्ला-वाशी अप व डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 या काळात मेगाब्लॉक

  • सीएसएमटीहून सकाळी 11.34 ते दुपारी 3.39 या काळात वाशी/ बेलापुर /पनवेल येथे जाणाऱ्या तसेच पनवेल/बेलापुर/वाशीहून सकाळी 10.21 ते दुपारी 3.41 या काळात सीएसएमटी येथे जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील.

 

  • ब्लॉपक काळात छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-कुर्ला आणि वाशी/पनवेल खंडावर विशेष सेवा चालविण्यात येतील.

 

  • ब्लॉक काळात सकाळी 10.00 ते सायंकाळी 4.30 वाजेपर्यत हार्बर मार्गावरील प्रवाशांना ट्रान्सर हार्बर/मुख्य  मार्गावर प्रवास करण्यााची मुभा राहील.

=================================================================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • स्पंदना- महिला लघुउद्योजकांच्या उत्पादनांसाठी व्यासपीठ