मेन आणि हार्बरवर आज मेगाब्लॉक

अविरत वाटचाल न्यूज

मुंबई, 2 सप्टेंबर 2018:

रेल्व मार्ग तसेच ओव्हरहेड वायर दुरुस्ती तसेच इतर तांत्रिक कामांसाठी मध्य रेल्वेतर्फे मेन आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे. या मेगाब्लॉकमुळे दोन्ही मार्गांवरील रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक बदलले आहे.

ठाणे-कल्‍याण डाऊन धीम्‍या मार्गावर सकाळी 11ते दुपारी 4 या काळात

  • सकाळी 10.37 पासून दुपारी 3.50 वाजेपर्यंत मुलुंडहून सुटणा-या डाऊन धीम्‍या/अर्ध जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि कल्‍याण स्‍थानकांदरम्‍यान डाऊन जलद मार्गावर चालविण्‍यात येतील. या सेवा ठाणे, दिवा आणि डोंबिवली स्‍थानकावर थांबतील तसेच या गाड्या आपल्‍या निर्धारित वेळे पेक्षा 10 मिनटे उशि‍रा शेवटच्‍या स्‍थानकांवर पोहचतील.
  • सकाळी 10.05 पासून दुपारी 2.54 वाजेपर्यंत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनसहून सुटणा-या डाऊन जलद मार्गच्‍या सेवा आपल्‍या निर्धारित थांब्‍यांव्‍यतिरिक्‍त घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि दिवा स्‍थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळे पेक्षा 20 मिनटे उशि‍रा शेवटच्‍या स्‍थानकांवर पोहचतील.
  • सकाळी 10.37 पासून दुपारी 3.06 वाजेपर्यंत कल्‍याणहून सुटणा-या अप जलद सेवा आपल्‍या निर्धारित थांब्यांव्‍यतिरिक्‍त दिवा, मुलुंड, भांडुप, विक्रोली, घाटकोपर आणि कुर्ला स्‍थानकांवर थांबतील आणि निर्धारित वेळे पेक्षा 15 मिनटे उशि‍रा शेवटच्‍या स्‍थानकांवर पोहचतील.
  • छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस येथे सकाळी 11पासून सायंकाळी 5 वाजेपर्यत आगमन/प्रस्‍थान करणा-या डाऊन तसेच अप मार्गावरील धीम्‍या गाड्या निर्धारित वेळेपेक्षा 10 मिनटे उशीरा पोहचतील
  • डाऊन धीम्‍या मार्गाच्‍या सेवा ब्‍लॉक काळात कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्ली स्‍थानकांसाठी उपलब्‍ध असणार नाही.  या स्‍थानकांच्‍या प्रवाशांसाठी अप दिशेत  ठाणे, दिवा, डोंबिवली तथा कल्‍याणमार्गे प्रवास करण्‍याची मुभा देण्‍यात आली आहे.
  • ब्‍लॉक काळात डाउन मेल/एक्‍सप्रेस गाड्या आपल्‍या गंतव्‍य स्‍थानकावर 15 मिनटे उशीरा पोहचतील।

हार्बरवर मेगाब्लॉक

  • छत्र‍पति शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी / बांद्रा डाऊन हार्बर मार्गावर सकाळी 11.40 पासून दूपारी 4.40 वाजे पर्यंत आणि चुनाभट्टी / बांद्रा-छत्र‍पति शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सांयकाळी 4.10 वाजेपर्यंत
  • छत्रपति‍ शिवाजी महाराज टर्मिनस/वडाळा रोड येथून सकाळी 11.34 वाजल्‍यापासून ते दूपारी 4.47 वाजेपर्यत वाशी/ बेलापुर /पनवेल येथे जाणा-या तसेच छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.56 ते दूपारी 4.43 वाजेपर्यत बांद्रा/अंधेरी च्‍या दिशेने जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील.
  • पनवेल/बेलापुर/वाशी येथून सकाळी 9.53 वाजल्‍यापासून ते दूपारी 3.20 वाजेपर्यत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणा-या सर्व सेवा तसेच अंधेरी/बांद्रा/गोरेगाव येथून सकाळी 10.45 वाजल्‍यापासून सायंकाळी 4.58 वाजपर्यंत छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणा-या सर्व उपनगरीय सेवा रद्द राहतील.
  • मेगाब्लॉकच्या काळात  हार्बर मार्गासाठी पनवेल-कुर्ला दरम्यान फलाट क्रमांक 8 वरुन विशेष गाड्या चालविण्यात येणार आहेत.
  • मेगाब्‍लॉक काळात सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यत हार्बर मार्गावरील प्रवाशांना पश्चिम रेल्‍वे/ मुख्‍य मार्गावर प्रवास करण्‍याची परवानगी देण्यात आली आहे.

======================================================================================================================

 

इतर बातम्यांचाही मागोवा

  • न्हावा शेवा- शिवडी ट्रान्सहार्बर लिंक रोड