नवी मुंबई महानगरपालिकेच्या लॅबमध्ये स्वाईन फ्ल्यूचीही चाचणी

सध्या 6 रुग्णांवर उपचार सुरू

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 19 ऑगस्ट 2022:

सध्याचा स्वाईन फ्ल्यूचा वाढता प्रभाव लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिकेने आपल्या कोविड आरटी-पीसीआर प्रयोगशाळेत स्वाईन फ्ल्यूच्या एच 1 – एन 1 ( swine flu test) चाचणीला सुरुवात केली आहे. अशाप्रकारे स्वतःच्या प्रयोगशाळेत एच 1 – एन 1 चाचणी करणारी नवी मुंबई ही बृहन्मुंबई महानगरपालिकेनंतरची राज्यातील पहिली महानगरपालिका आहे. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात ( navi mumbai )स्वाइन फ्ल्यूचा पहिला रुग्ण 19 जुलै 2022 रोजी आढळला होता. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात आत्तापर्यत एकूण 74 हजार 968 इतक्या फ्ल्यू सदृष्य रुग्णांची ओपीडीमध्ये स्क्रिनींग करण्यात आलेली असून 33 रुग्णांना स्वाइन फ्लूची लागण झाली असल्याचे आढळून आले आहे. यापैकी सद्यस्थितीत 6 रुग्ण उपचाराधीन आहेत.

तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांचेच सॅम्पल्स

सद्यस्थितीत नवी मुंबई महानगरपालिका( navi mumbai ) क्षेत्रात आढळणा-या संशयित स्वाईन फ्ल्यू रूग्णांचे एच 1 – एन 1 सॅम्पल एनआयव्ही, पुणे या लॅबला पाठवण्यात येत होते. तथापि तेथून रिपोर्ट प्राप्त होण्यास लागणारा काहीसा कालावधी आता नवी मुंबई महानगरपालिकेच्या स्वतःच्या लॅबमध्ये टेस्ट्स केल्याने वाचणार असून त्यामुळे संशयित रुग्णावर जलद सुयोग्य उपचार करणे शक्य होणार आहे. केंद्रीय आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार तीव्र लक्षणे असणाऱ्या रुग्णांचेच सॅम्पल्स टेस्टींगकरिता घेतले जात असून 5 रुग्णांचे सॅम्पल्स टेस्टींगसाठी घेण्यात आलेले आहेत.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने मध्यम अथवा तीव्र स्वरूपाची स्वाइन फ्लूची लक्षणे ( swine flu test) असणाऱ्या रुग्णांना उपचाराकरिता सार्वजनिक रुग्णालय वाशी येथे उपचार सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. या रुग्णांचे नमुने सार्वजनिक रुग्णालय, वाशी येथे संकलित करून माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरूळ येथील लॅबमध्ये तपासणी करण्यासाठी पाठविण्यात येत आहेत.

 

स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधात्मक लसीचा डोस

स्वाइन फ्ल्यू वर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून शासनामार्फत दुसऱ्या व तिसऱ्या तिमाहीतील गरोदर माता, उच्च रक्तदाब किंवा मधुमेह असणाऱ्या व्यक्ती तसेच फ्ल्यू रुग्णांची तपासणी देखभाल आणि उपचारात सहभागी डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी यांना स्वाईन फ्ल्यू प्रतिबंधात्मक लसीचा एक डोस नवी मुंबई महानगरपालिकेच्या 3 रुग्णालयात आणि 23 नागरी आरोग्य केंद्रात देण्यात येत आहे.  नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत स्वाइन फ्ल्यू प्रतिबंधात्मक लसीचा डोस 1 हजार 499 लाभार्थ्यांना देण्यात आला आहे.

 

दोन वर्षांत 13 लाख 73 हजार 288 कोविड चाचण्या

कोविड प्रभावित काळामध्ये आयसीएमआर शासकीय परवानगीसह केवळ 11 दिवसांच्या कालावधीत सुरू केलेल्या नवी मुंबई महानगरपालिकेच्या माँसाहेब मिनाताई ठाकरे रुग्णालय, नेरूळ येथील आरटी-पीसीआर लॅबमुळे जलद रिपोर्ट प्राप्त होऊन कोविडचा प्रभाव रोखण्यासाठी अतिशय मोलाची मदत झाली. प्रतिदिन 5000 टेस्ट्स क्षमतेच्या या लॅबमध्ये 4 ऑगस्ट 2020 पासून दोन वर्षांत आतापर्यंत 13 लाख 73 हजार 288 इतक्या कोविड चाचण्या झालेल्या आहेत.

 

फ्ल्यू रुग्णांचे रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या आधारे तीन गटांमध्ये वर्गीकरण

स्वाईन फ्ल्यू ( swine flu test) हा आजार एन्फ्लुएन्झा एच 1 – एन 1 या विषाणूमुळे होतो. नवी मुंबई महानगरपालिकेची नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालये येथे प्रत्येक फ्ल्यू सदृश्य रुग्णांची ताप, घसादुखी, घशाला खवखव, खोकला, नाक गळणे, अंगदुखी, डोकेदुखी या लक्षणांबाबत विचारपूस करण्यात येते. अशा प्रकारच्या रुग्णांमध्ये इतर कोणतेही निदान झाले नसल्यास एन्फ्लुएन्झा करिता तपासणी करण्यात येते. अशा फ्ल्यू रुग्णांचे त्यांच्या लक्षणाच्या आधारे तीन गटांमध्ये वर्गीकरण करण्यात येते. त्यापैकी सौम्य फ्ल्यू रुग्णांवर लक्षणानुसार नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर उपचार करण्यात येतो. व अशा रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेऊन आवश्यकतेनुसार त्यांच्यावरही उपचार करण्यात येतो. अति जोखमीच्या घरगुती निकट सहवासितांना विशेष लक्ष देणेकरिता सल्ला देण्यात येऊन त्यांना प्रतिबंधात्मक स्वरूपात मार्गदर्शक सूचनांनुसार उपचार देण्यात येतात.

 

स्वाईन फ्ल्यू टाळण्यासाठी काय करावे

एन्फ्लुएन्झा एच 1 – एन 1 (स्वाईन फ्ल्यू) ( swine flu test) टाळण्यासाठी वारंवार साबण व स्वच्छ पाण्याने हात धुणे,

पौष्टिक आहार घेणे,

भरपूर पाणी पिणे,

पुरेशी झोप आणि विश्रांती घेणे,

धुम्रपान टाळणे या खबरदारीच्या उपाययोजना अंमलात आणाव्यात.

फ्ल्यू सदृश्य लक्षणे असल्यास त्वरित नजिकच्या नमुंमपा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व सार्वजनिक रुग्ण्यालयांशी संपर्क साधून आरोग्य सल्ला घ्यावा.

शाळेत जाणारे विद्यार्थी, शिक्षक आणि शाळेत काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांमध्ये फ्लू सदृश्य लक्षणे आढळल्यास त्यांनी आवश्यक वैदयकिय उपचार घ्यावेत व शक्यतोवर लोकसंपर्क टाळावा.

स्वाईन फ्लू आजाराबाबत घाबरून न जाता योग्य माहिती, योग्य वैदयकिय सल्ला व प्रतिबंधात्मक उपाययोजना करुन आजाराचा प्रसार थांबविण्याचे आवाहन ( navi mumbai ) महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

——————————————————————————————————-