एन.एम.एम.टी. च्या ताफ्यात 30 मिडी बस

अविरत वाटचाल न्यूज

नवी मुंबई,11 सप्टेंबर 2018:

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या सेवेत आज नवीन 30 मिडी बसेस दाखल झाल्या असून कोपरखैरणे सेक्टर 3 येथील बस डेपोमध्ये या मिडी बसेसचे लोकार्पण नवी मुंबईचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते करण्यात आले. मार्ग क्रमांक 8, 21, 22 या मार्गांवर सध्या या मिडी बसेस धावणार आहेत.

 

याप्रसंगी ऐरोली विधानसभा सदस्य आमदार संदीप नाईक, महापालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., स्थायी समितीचे सभापती तथा परिवहन समितीचे पदसिध्द सदस्य सुरेश कुलकर्णी, सभागृहनेते रविंद्र इथापे, कार्यक्रमाचे निमंत्रक तथा परिवहन समितीचे सभापती रामचंद्र तथा आबा दळवी, इ प्रभाग समिती अध्यक्ष लता मढवी, नगरसेवक निवृत्ती जगताप, परिवहन समिती सदस्य प्रदिप गवस,. राजु शिंदे, अब्दुल जब्बार खान, काशिनाथ पाटील, राजेंद्र इंगळे, विरेश सिंग, सुधीर पवार, राजेंद्र आव्हाड, समिर बागवान तसेच महानगरपालिकेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी धनराज गरड, परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक शिरीष आरदवाड व मुख्य लेखा व वित्त अधिकारी निलेश नलावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या 82 व्होल्व्हो बसेससह एकूण 452 बसेसच्या ताफ्यामध्ये 30 नवीन मिडी बसेसची भर पडली असून आयशर व्होल्व्हो प्रकारच्या या बसेस सेमी ॲटोमॅटीक स्वरुपाच्या आहेत. यामध्ये ॲटोमॅटीक मॅन्युअल ट्रान्समिशन पध्दतीचा वापर करण्यात आला असून क्लच विरहीत व गिअरचा कमीत कमी वापर करावा लागत असल्याने चालकांसाठी या बस अत्यंत आरामदायी आहेत हे या बसेसचे प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. सध्या 70 विविध मार्गांवरून एन.एम.एम.टी. बससेवा पुरविली जात आहे.

===========================================================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • नेरुळ-खारकोपर रेल्वे मार्ग ऑक्टोबरपासून- सिडको एमडी