कोयना प्रकल्पग्रस्तांच्या जमिनींच्या व्यवहारांच्या चौकशीचे काम प्रगतीपथावर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १५ मार्च २०१९:

पनवेल तालुक्यातील मौजे ओवे येथील सिडको अधिसुचित क्षेत्रातील कोयना प्रकल्पग्रस्तांना वाटप केलेल्या सर्व्हे. क्र. 183 मधील गेल्या 15 वर्षांतील जमिनींच्या व्यवहारांची तसेच संबंधित अन्य प्रकरणांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र शासन निर्णय क्र.सिआयडी-3318/प्र.क्र.210/नवि-10,दि. 03 ऑक्टोबर, 2018 अन्वये एक सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. 14 जानेवारी 2019 पासून सदर समितीचे काम सुरू झालेले आहे.

  • सदर प्रकरणाविषयी समितीकडे माहिती देण्याचा कालावधी 15 जानेवारी ते 30 जानेवारी 2019 निश्चित करण्यात आला होता. या दरम्यान चौकशीच्या प्रथम टप्प्यात समितीकडे काही माहिती प्राप्त झाली आहे . आणखी काही माहिती प्राप्त होणे बाकी आहे. प्रथम टप्प्यात मिळालेल्या माहितीची छाननी करून समितीच्या अध्यक्षांनी चौकशीच्या दुसऱ्या टप्प्यात गरजेनुसार नवीन पत्रव्यवहार केला असून संबंधितांकडून माहिती येणे बाकी आहे. सदर चौकशी समितीचे काम प्रगतीपथावर असून चौकशीसंदर्भात मिळणाऱ्या प्रतिसादानुसार समितीचे काम समितीद्वारे लवकरात लवकर पूर्णत्वास नेण्याचा प्रयत्न सुरू आहे., असे सिडकोतर्फे कळविण्यात आले आहे.

====================================================

इतर बातम्यांचाही मागोवा