सिडको अध्यक्षांकडून नागरी सुविधांची पाहणी

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
पनवेल, 7 जून 2019:

सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोचा पदभार स्विकारल्यापासून सिडको हद्दीतील परिसरात विविध सुविधा देण्यावर विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सिडकोच्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरी सुविधा देण्याचे काम झपाट्याने होत आहे. त्या अनुषंगाने नविन पनवेल येथे असलेले रस्ते, मैदान, गटारे, बगीचे, तलाव आदी बाबींची सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी पाहणी करून तातडीने समस्या सोडविण्यासंदर्भात अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, नगरसेवक संतोष शेट्टी, समीर ठाकूर, नगरसेविका राजश्री वावेकर, वृषाली वाघमारे, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.

===============================================

इतर बातम्यांचाही मागोवा