रूग्णालये, नर्सिंग होम मध्ये स्वच्छता मोहीम

 नवी मुंबई, 10 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील रूग्णालये, दवाखाने व नर्सिंग होम्स या ठिकाणी स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे.

त्यानिमित्ताने आज वाशी विभागांतर्गत महानगरपालिका रुग्णालयामध्ये विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या वेळी रुग्णालयाच्या ठिकाणी आवश्यकतेनुसार कचरा कुंड्या बसविण्यात आल्या. तसेच सर्व रुग्णालयामध्ये अंतर्गत व परिसरात स्वच्छ करण्यात आला. रुग्णालयाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी प्रशांत जवादे यांनी रूग्ण व नागरिकांना स्वच्छतेबाबत विशेष मार्गदर्शन केले. या मोहिमेमध्ये वाशी विभागातील स्वच्छता अधिकारी विनायक जुईकर, स्वच्छता निरीक्षक  जयश्री आढाल,  संतोष देवरस, यश पाटील,  जयेश पाटील, डॉक्टर, नर्स व आरोग्य कर्मचारी, स्वच्छाग्रही व स्थानिक रहिवाशी मोठयासंख्येने सहभागी झाले होते.