राम शिंदे यांनी घेतला पणन विभागाच्या कामांचा आढावा

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
मुंबई, १७ जून २०१९ :

नाफेडच्यावतीने खरेदी करण्यात आलेल्या कडधान्य व तेलबिया यांची हमीभावाने खरेदी केलयानंतर शेतक-यांची चुकारे देण्याबाबत तसेच पणन संबंधित कार्यालयांच्या कामांचा आढावा पणन व वस्त्रोद्योग मंत्री राम शिंदे यांनी घेतला.

पणन विभागांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघ, महाराष्ट्र राज्य कपूस उत्पादक पणन महासंघ, वखार महासंघ, पणन संचालक आणि कृषी पणनमंडळ या कार्यालयांच्या कामांचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.

  • सहाकरी पणन महासंघ, कॉटन फेडरेशन, वखार महासंघ यातील पदे भरताना हमीभावाने खरेदी किती होते यावर अवलंबून असल्याने या तीन संघांनी एकंदरीत व्यवसायाचा नफा पाहून कमीत कमी परंतु गरजेपुरते पदे भरण्याची दक्षता घ्यावी यासाठी उच्चस्तरीय समिती अथवा मंत्रिमंडळाची मान्यता आवश्यक असल्यास घ्यावी, असेही शिंदे यांनी यावेळी सांगितले. तिन्ही महासंघाचे आऊट लेट, बाजारसमित्या, त्यांच्या निवडणुका, खाजगी बाजार त्यांची उलाढाल अशा विविध विषयांच्या कामांचा आढावा शिंदे यांनी यावेळी घेतला.

 

==============================================

इतर बातम्यांचाही मागोवा