अल्पबचत व्याजदरात 0.1 टक्क्यांनी कपात

टपाल कार्यालयातल्या बचत खात्यांवरचे व्याजदर “जैसे थे”

मुंबई, 1 एप्रिल 2017 :

केंद्र सरकारने वित्तीय वर्ष 2017-18 च्या पहिल्या तिमाहीसाठी विविध अल्पबचत योजनांसाठीच्या व्याजदरात बदल केले आहेत. सरकारने सर्व योजनांवरचे व्याजदर 0.1 टक्क्यांनी कमी केले आहेत. मात्र टपाल कार्यालयातल्या बचत खात्यांवरचे व्याजदर “जैसे थे” ठेवण्यात आले आहेत. व्याजदर पध्दतीत अधिक व्यापकता आणण्याच्या दृष्टीने,व्याजदरात हे बदल करण्यात आले आहेत.  व्याजदरात घट असली तरी, ते बँक ठेवींपेक्षा बचतीसाठी अधिक आकर्षक आहेत.