कोकण विभागीय आयुक्त पदी शिवाजीराव दौंड रुजू

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, १७ जुलै २०१९

कोकण विभागीय महसूल आयुक्त पदी शिवाजीराव दौंड यांची नियुक्ती झाली आहे. दौंड यांनी आज पदभार घेतला.

  • शिवाजीराव दौंड हे यापूर्वी सामान्य प्रशासन विभागाचे सचिव आणि विशेष चौकशी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी- जिल्हा परिषद जालना, सचिव- राज्य माहिती आयोग, मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, लघूउद्योग विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक, खादी ग्रामोद्योगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अशा विविध पदावर काम केले आहे.

 

  • कोकण विभागात पर्यटन आणि फलोत्पादन, बंदर विकास, रायगड किल्ला संवर्धन, मत्स्य व्यवसाय, स्मार्ट सिटी, कुपोषणमुक्ती या क्षेत्रात विशेष काम करण्यावर आपण भर देणार असल्याचे त्यांनी पदभार घेतल्यानंतर सांगितले.

=======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा