२७ मे रोजी सायन- पनवेल महामार्ग रोखण्याचा इशारा

सर्व्हिस रोडसाठी नवी मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत आक्रमक

अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, २६ मे २०१९

सध्या सायन – पनवेल महामार्गाच्या विस्तारीकरणासोबतच दुरूस्तीची कामेही युद्धपातळीवर सुरू आहे. या महामार्गालत सर्व्हिस रोडचे काम अर्धवट असल्यामुळे वाशी गाव तसेच वाशी येथील सेक्टर १ ते सेक्टर १७ मधील नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैर सोय होत आहे. याप्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार मागणी करूनही कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नाईलाजास्तव आपल्या न्याय्य मागण्यांसाठी  २७ मे रोजी वाशी गाव येथे सायन –पनवेल महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते दशरथ भगत यांनी शनिवारी दिला.

सायन –पनवेल महामार्गालगत सर्व्हिस रोडचे काम रखडल्यामुळे वाशी गावातील ग्रामस्थांचे तसेच वाशी शहरातील नागरिकांचे हाल होत आहेत. याबाबत माहिती देण्यासाठी दशरथ भगत यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेला काँग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेविका फशीबाई भगत, काँग्रेसचे युवा जिल्हाध्यक्ष निशांत भगत, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नायडू , शैलेश घाग आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. पत्रकार परिषदेत निशांत भगत यांनी ग्रामस्थांना भेडसावणार्या समस्यांची माहिती दिली.

 

नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्थेच्या मागण्या
  • नवी मुंबई स्पोर्ट्स क्लब येथून भुयारी मार्गाने महामार्गावर मुंबईला जाणार्या दिशेने वेगवान वाहनांमुळे बर्याचदा अपघात होता. त्यामुळे या ठिकाणी जोडरस्ते बंद करण्या आधी सुरक्षित पर्यायी सर्व्हिस रस्ता तयार करणे.
  • वाशी गाव जुन बस स्टँडला जुन्या भुयारी मार्गाजवळ बनविलेल्या नवीन बस थांबा येथे स्थलांतरीत करणे .
  • वाशी गावातील भुयारी मार्गात भरणारे पाणी काढण्यासाठी सक्षम पंप हाऊस बसविणे.
  • स्थानिक मच्छिमारांसाठी जुने खाडी पूल  ते वाशी गाव असा पदपथ करण्यात यावा.
  • वाशी टोल नाक्याच्या पुढे असलेल्या मोकÈया जागी वा जुन्या जकात नाक्याजवळ टोल नाका स्थलांतरीत करावा, जेणे करून वाशी गावाजवळ वाहनांची कोंडी होणार नाही, अशा ग्रामस्थांच्या  विविध मागण्या असल्याचे दशरथ भगत यांनी सांगितले.
  • याप्रकरणी वारंवार पाठपुरावा करूनही आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकार्यांकडून कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिUत नसल्यामुUेच आम्ही आंदोलनाचे हत्यार उगारले आहे. या आंदोलनात शिवसेने खा. राजन विचारे, राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक, भाजप आ. मंदा म्हात्रे, काँग्रेस नगरसेवक अविनाथ लाड, अंजली वाळुंज, राष्ट्रवादीच्या नगरसेविका दिव्या गायकवाड, दमयंती शेवाळे, प्रज्ञा भोईर, नगरसेवक किशोर पाटकर, हरिश्चंद्र भोईर, शशिकांत राऊत यांनी सहभागी व्हावे असे आवाहन दशरथ भगत यांनी केले आहे.

=======================================================

इतर बातम्यांचाही मागोवा

  • जीणं सन्मानाचं हवं