सिडकोची विभागीय पाणी देयक स्वीकृती केंद्रे बंद

बिले आता ऑनलाइन पद्धतीने भरावी लागणार
अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
नवी मुंबई, 10 जानेवारी 2020: नवी मुंबईतील सिडकोच्या विभागीय कार्यालयांमधील पाणी देयक स्वीकृती केंद्रे 1 जानेवारी, 2020 पासून बंद करण्यात आल्यामुळे पाणी बीले आता केवळ ऑनलाइन पद्धतीने स्वीकारली जाणार आहेत. त्यासाठी नळ जोडणीधारकांना त्यांचा ग्राहक क्रमांक लक्षात ठेवावा लागणार आहे.
नवी मुंबईतील सिडकोच्या नळ जोडणीधारकांची ऑक्टोबर-नोव्हेंबर 2019 आणि यापुढील पाणी देयके ही केवळ ऑनलाइन पद्धतीनेच स्वीकारली जाणार आहेत.

नवी मुंबई क्षेत्रातील सिडको प्रशासित गावे व काही नोड्सना सिडकोतर्फे पाणी पुरवठा करण्यात येतो. या गावांतील व नोड्समधील सिडकोच्या नळ जोडणीधारकांकरिता www.cidco.maharashtra.gov.in या सिडकोच्या अधिकृत संकेतस्थळावर पाणी देयके ऑनलाइन भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. संकेतस्थळावर पाणी देयके भरण्यासाठी नळ जोडणीधारकांना त्यांचा ग्राहक क्रमांक माहित असणे आवश्यक आहे. पाणी देयकाची प्रत संकेतस्थळावरून डाऊनलोड करण्याचीही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

नळ जोडणीधारकांना आपल्या पाणी देयकाचे शुल्क अदा करताना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बॅंकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस यांपैकी एका पर्यायाची निवड करता येईल. शुल्क भरणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुल्क भरल्याची ऑनलाइन पावतीही मिळणार आहे.
नळ जोडणीधारकांना आपल्या पाणी देयकाचे शुल्क अदा करताना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, नेट बॅंकिंग, आरटीजीएस, एनईएफटी, आयएमपीएस यांपैकी एका पर्यायाची निवड करता येईल. शुल्क भरणा प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शुल्क भरल्याची ऑनलाइन पावतीही उपलब्ध होईल.
रोख/चेक/डीडी अशा कोणत्याही स्वरूपात पाणी देयके स्वीकारण्यात येणार नसल्याचे सिडकोच्यावतीने कळविण्यात आले आहे.

————————————————————————————————————-