गणेशोत्सव काळात रोहा ते चिपळुण विशेष मेमु धावणार

 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 13 जुलै 2022-07-13

गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी लक्षात घेता कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते चिपळुण दरम्यान विशेष मेमु लोकल चालविण्यात येणार आहेत. 19 ऑगस्ट ते 12  सप्टेंबर या काळात विशेष मेमु चालविण्यात येणार आहेत.

गाडी क्रमांक 01157 रोहा-चिपळुण ही मेमु गाडी 19 ते 21 ऑगस्ट, 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर, 10 ते 12 सप्टेंबर या काळात सकाळी 11.5 ला रोहा येथून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.20 ला चिपळुण येथे पोहोचेल.

गाडी क्रमांक 01158 चिपळुण- रोहा ही मेमु गाडी 19 ते 21 ऑगस्ट, 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर, 10 ते 12 सप्टेंबर या काळात दुपारी 1.45 ला चिपळुण येथून सुटेल आणि त्याचदिवशी संध्याकाळी 4.10 ला रोहा येथे पोहोचेल.

  • गाडीचे थांबे

या विशेष मेमु गाड्यांना माणगाव, वीर, करंजाडी, विन्हेरे आणि खेड स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. या विशेष मेमु गाड्यांना आठ डबे जोडण्यात येणार आहेत.

====================================================