व्यावसायिक नाट्य स्पर्धेची पारितोषिके जाहीर

 मुंबई, 8 मे 2017/AV News Bureau:

29 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत जिगिषा आणि अष्टविनायक, मुंबई यासंस्थेच्या ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकासाठी 7 लाख 50 हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाले आहे. ‘कोड मंत्र’ हे नाटक दुसरे तर अमर फोटो स्टुडियोला तिसरा क्रमांक मिळाला आहे. या दोन्ही नाटकांना अनुक्रमे 4 लाख 50 हजार आणि 3 लाखांचे पारितोषिक मिळाले आहे.

इतर पुरस्कार पुढीलप्रमाणे-

  • दिग्दर्शन :- प्रथम पारितोषिक (1,50,000/-) चंद्रकांत कुलकर्णी (नाटक-मग्न तळ्याकाठी) द्वितीय पारितोषिक(1,00,000/-) राजेश जोशी (नाटक-कोडमंत्र) तृतीय पारितोषिक (50,000/-)निपुण धर्माधिकारी (नाटक-अमर फोटोस्टुडिओ)
  • नाट्यलेखन : प्रथम पारितोषिक (1,00,000/-) मनस्विनी लता रविंद्र (नाटक-अमर फोटो स्टुडिओ) द्वितीय पारितोषिक (60,000/-) महेश एलकुंचवार (नाटक-मग्न तळ्याकाठी) तृतीय पारितोषिक(40,000/-) विजय निकम (नाटक-कोडमंत्र)
  • प्रकाश योजना : प्रथम पारितोषिक (रु.40,000/-) रवि रसिक (नाटक-मग्न तळ्याकाठी) द्वितीय पारितोषिक (30,000/-) भोतेश व्यास (नाटक-कोडमंत्र) तृतीय पारितोषिक (20,000/-) योगेश केळकर (नाटक-किमयागार)
  • नेपथ्य : प्रथम पारितोषिक (40,000/-)प्रसाद वालावलकर (नाटक-कोड मंत्र) द्वितीय पारितोषिक (30,000/-) प्रदिप मुळ्ये (नाटक-मग्न तळ्याकाठी) तृतीय पारितोषिक(20,000/-) प्रदिप मुळये (नाटक-अमरफोटो स्टुडिओ)
  • संगीत दिग्दर्शन : प्रथम पारितोषिक (40,000/-) आनंद मोडक व राहुल रानडे (नाटक-मग्न तळ्याकाठी) द्वितीय पारितोषिक (30,000/-) सचिन जिगर (नाटक-कोडमंत्र) तृतीय पारितोषिक (रु.20,000/-) राहुल रानडे (नाटक-बंध-मुक्त)
  • वेशभूषा : प्रथम पारितोषिक (40,000/-) प्रतिमा जोशी व भाग्यश्री जाधव (नाटक-मग्न तळ्याकाठी) द्वितीय पारितोषिक (30,000/-) कल्याणी कुलकर्णी-गुगले (नाटक-अमर फोटो स्टुडिओ) तृतीय पारितोषिक (20,000/-) अजय खत्री (नाटक-कोड मंत्र)
  • रंगभूषा : प्रथम पारितोषिक (40,000/-) अभय मोहिते (नाटक-अमर फोटो स्टुडिओ), द्वितीय पारितोषिक (30,000/-) शरद सावंत (नाटक-मग्न तळ्याकाठी), तृतीय पारितोषिक (20,000/-) संतोष पेडणेकर व हेमंत कदम (नाटक-कोड मंत्र)
  • उत्कृष्ट अभिनय रौप्यपदक व 50,000/-

पुरुष कलाकार : चिन्मय मांडलेकर (नाटक-मग्न तळयाकाठी), अमेय वाघ (नाटक-अमर फोटो स्टुडिओ), वैभव मांगले (नाटक-मग्न तळ्याकाठी), सुव्रत जोशी (नाटक-अमर फोटो स्टुडिओ), प्रशांत दामले (नाटक-साखर खाल्लेला माणूस)

स्त्री कलाकार : मुक्ता बर्वे (नाटक-कोड मंत्र), निवेदिता सराफ (नाटक-मग्न तळ्याकाठी), लिना भागवत (नाटक-के दिल अभी भरानही), हेमांगी कवी (नाटक-ती फुलराणी), इला भाटे (नाटक-यु टर्न-2)

2 ते 6 मे 2017 या कालावधीत आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल या ठिकाणी अतिशय जल्लोषात झालेल्या या स्पर्धेत एकूण 10 व्यावसायिक नाट्य प्रयोग सादर करण्यात आले. स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आशालता वाबगांवकर, श्रीनिवास भणगे, चंद्रकांत मेहेंदळे,  अजित सातभाई आणि सुनिल देवळेकर यांनी काम पाहिले.