भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव, कविता जाधव यांच्या दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन

बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्याहस्ते प्रकाशन झाले

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १० डिसेंबर २०२०

नवी मुंबईः सीवूड्स येथील भाजपचे ज्येष्ठ माजी नगरसेवक भरत भरत जाधव व माजी नगरसेविका कविता भरत जाधव यांच्या दिनदर्शिका 2021 चे प्रकाशन बेलापुर विधानसभेच्या कार्यसम्राट आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आले.

या दिनदर्शिकेवर कार्यसम्राट माजी नगरसेवक भरत जाधव व नगरसेविका कविता भरत जाधव यांनी कोरोना कालावधीमध्ये सीवुड्स, नवी मुंबई व जामखेड या परिसरात केलेल्या एकूण कार्याचा आढावा घेण्यात आला आहे. या 10000 दिनदर्शिकाचे वाटप सीवूड्स मधील प्रत्येक घरात केले जाणार आहे.

याप्रसंगी माजी नगरसेवक भरत जाधव यांच्या समवेत भाजपचे पदाधिकारी जयवंत तांडेल, दत्ता घंगाळे, अरविंद वाढवणे, प्रसाद ठाकुर, प्रियंका राऊत, अज्जू कदम, विष्णू पवार हे उपस्थित होते.

================================================

  • मागील बातम्यांचा मागोवा