कोविड आणीबाणी काळात आपची कोविड व्हर्चुअल वॉर रूम

आपची हेल्पलाईन 9222335520 / 7021809340 नवी मुंबईकरांसाठी ठरतेय संजीवनी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, ४ मे २०२१

सध्या कोरोनाने आक्राळ विक्राळ रुप धारण केले असून आरोग्य व्यवस्थेवर पडणारा  प्रचंड ताण लक्षा घेवून आम आदमी पक्ष नवी मुंबई प्रशासनाच्या मदतीला धावून आली आहे. आपतर्फे नवी मुंबईतील नागरिकांसाठी २४ तास उपलब्ध असणारी व्हर्चुअल वॉर रूम (हेल्पलाईन 9222335520 / 7021809340 ) तयार केली आहे. या वॉर रुमच्या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधल्यास नागरिकांना व्हेंटीलेटर ,बेड, ऑक्सिजन ,ऍम्ब्युलन्स ,औषधी,  प्लाझ्मा आणि अन्य मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

महापालिकेवरच्या आरोग्य विभागावर असणारा प्रचंड ताण पहता आपने यात आपले कर्तव्य पार पडायचे ठरवले.  सुरवातीच्या काळात डाटाबेस बनवण्यासाठी टीम बनवली गेली, जिने संपूर्ण व्हाट्सअँप वरती आलेल्या मेसेज पहिल्यांदा  पडताळून  पाहून, शाश्वती आणि खात्री  केल्यावरच   टीम ने मिळालेल्या नंबरवरील  संस्था  किंवा  व्यक्तींशी  प्रत्यक्ष  संवाद  साधला . डॉक्टर्स मेडिकल स्टोअर्स, महापालिकेनेही मदतीचा हात दाखवला आणि आप  नवी  मुंबई  टीम ने आपले काम सुरु केले. आता पर्यंत  ४५० बाधित परिवाराच्या च्या मदतीस आपने आपल्या व्हर्चुअल वॉर रूम च्या माध्यमातून मदत पोहवचलीय आहे, नवी मुंबई, पनवेल, मुंबई, नाशिक पुणे येथून लोकांना मदतीचा हात पुढे केले गेलाय,अश्या प्रकारची माहिती  आप चे नवी मुंबई चे अध्यक्ष प्रमोद महाजन यांनी दिली.

  1. खाजगी दवाखांच्या वाढत्या बीलांसदर्भात आपने  आवाज उठवला आहे.
  2. प्लाझ्मा डोनर माहिती बँक उपलब्ध करून दिली आहे. त्याचा नागरिकांकडून प्रचंड प्रतिसाद मिळाला
  3. विविध वॉर्डमधील नागरिकांना फोन कॉल्स द्वारे संकट समयी मदतीची विचारणा करून समस्येचा सामना कसा करावा याबद्दल मार्गदर्श केले जातेय. 
  4. मास्क वाटप, वॉर्डात सॅनिटासिंग, गरजूंना अन्नधान्य वाटप सारखे अत्यंत गरजेचे  उपक्रम राबवून आपने सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न सुरू ठेवला आहे.
  5. मृतदेहाचे  व्यवस्थापन बाबतीतही  आपचे पदाधिकारी जबादारी उचलून काम करीत आहेत.

आप, नवी मुंबईकरांना कोरोनच्या कठीण काळात मदतीसाठी तयार आहे. ही लढाई आपल्या सर्वांची आहे आणि ती सर्वानी एकत्र येऊन कोरोना चा प्रादुभाव  वाढणार नाही म्हणून  काळजी  घ्यायची  आहे असे मत आप  नवी  मुंबई  कोव्हीड  वॉर  रूम  प्रमुख  रूपक तिवारी यांनी  व्यक्त  केले.

  • येणारे फोन कॉल्स हि  कोरोनाची भयानकता, हतबल  कुटुंबे  आणि  कोलमडलेली  आरोग्य  व्यवस्था   दर्शवत होती,   पण व्हर्चुअल वॉर रूम वर  काम  करताना  सामाजिक  कर्तव्याची  जाण होत होती आणि मग बेधडक कामाला सुरुवात केली . – आप नवी  मुंबई  युवा  अध्यक्ष  चिन्मय  गोडे (वॉर्ड 91)

  • वार्डातून  असो कि नवी मुंबईतून  आलेले  एक  एक  फोन कॉल हा बाधित परिवाराचं सांत्वन करून त्याची समस्या  सोडविण्यासाठी  ताकद  देत  होता. कित्येक मृतदेहाचे शेवटचे कार्य करण्यासाठी देखील मदत केली गेली, आज उर भरून येतेय, समाधान झाले . आप  नवी  मुंबई  महिला  उपाध्यक्ष   सुलोचना शिवानंदन (वॉर्ड 60)

 

  • मास्क आणि सॅनिटायसर चे डिस्ट्रिब्युशन करून वॉर्डात जनजागृती करताना बाधित लोकांजवळ मदत कशी पोहचेल यासाठी वॉर रूम ने मार्गदर्शन केले, आप  नवी  मुंबई  कोव्हीड  वॉर  रूम  कार्यकर्ता अभिषेक पांडे (वॉर्ड 37).

 

  • या  कठीण  प्रसंगी  गरजूना अन्नधान्य वाटपाचे  काम  देखील  टीम  आप  नवी  मुंबई  कडून  करण्यात  आले, सुमीत कोटियांन (वॉर्ड 38).

कोविड वॉर रूम मध्ये पूर्वी मोदी (वॉर्ड 90) , नीना जोहरी (वॉर्ड 42), वंदना रैना (वॉर्ड 103),  सुनील जाधव (वॉर्ड 71), (वॉर्ड    ), सुवर्ण जोशी (वॉर्ड 63), प्रीती शिंदेकर (वॉर्ड 23), शुभांगी  वाघमारे (वॉर्ड 82), छाया खेमानी  (वॉर्ड 79), कौशल  सिंग (वॉर्ड 46), महादेव गायकवाड (वॉर्ड 45), जाकीर कुरेशी, चेतना गावडे, पुष्पक वंजारी, मानसी पवार, पुष्पक वंजारी, देवेंद्र  सैनी, कोमेश चौरसिया,देवकरण नेहरा ह्यांचा सक्रिय सहभाग आहे .

================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप