अंगणेवाडी जत्रेसाठी 8 विशेष गाड्या

नवी मुंबई,24 फेब्रुवारी 2017/AV News Bureau:

अंगणेवाडी जत्रेसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात चाकरमानी कोकणात जात असतात. यापार्श्वभूमीवर मध्य रेल्वेने खास अंगणेवाडी जत्रेसाठी सीएसटी/लोकमान्य टिळक टर्मिनस ते सावंतवाडीदरम्यान 8 विशेष  गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

  • लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी रोड विशेष (2)
  1. गाडी क्रमांक 01161 विशेष गाडी 28 फेब्रुवारी (मंगळवार) रोजी पहाटे 5.33 लाक लोकमान्य टिळक टर्मिनसहून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 3 वाजता सावंतवाडी रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01162 विशेष गाडी 28 फेब्रुवारी (मंगळवार) रोजी सायंकाळी 5 वाजता सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.25 ला लोकमान्य टिळक टर्मिनस स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे:

या गाड्यांना  ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे.

  • गाडीचे डबे :

या गाड्यांना एक एसी आसनव्यवस्था असलेला डबा. 13 डबे दुसऱ्या वर्गाचे आसनव्यवस्था असलेले डबे

  • लोकमान्य टिळक टर्मिनस- सावंतवाडी रोड विशेष (2)
  1. गाडी क्रमांक 01163 विशेष गाडी 1 मार्च (बुधवारी) रोजी सकाळी 7.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 7.20 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01164 विशेष गाडी 2 मार्च (गुरुवारी) रोजी सायंकाळी  5 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 3.25 ला लोकमान्य टिळक टर्मिनस रेल्वे स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे :

या गाड्यांना  ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापुर रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे.

  • गाडीचे डबे :

या गाड्यांना एक एसी आसनव्यवस्था असलेला डबा.  दुसऱ्या वर्गाचे आसनव्यवस्था असलेले 13 डबे.

  • छत्रपती शिवाजी टर्मिनस – सावंतवाडी रोड विशेष (2)
  1. गाडी क्रमांक 01157 विशेष गाडी 1 मार्च रोजी मध्यरात्री (मंगळवार/ बुधवार) 12.20 ला सीएसटी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 10 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.
  2. गाडी क्रमांक 01158 विशेष गाडी सकाळी 11.15 ला सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 10.45 ला सीएसटी स्थानकात पोहोचेल.
  • गाडीचे थांबे:
  • या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापुर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे
  • गाडीचे डबे :
  • 1 एसी 2 टायर, 2 एसी -3 टायर, 4 स्लीपर क्लास आणि 9 दुसऱ्या वर्गाचे डबे.

सीएसटी- सावंतवाडी रोड विशेष (2)

गाडी क्रमांक 01159 विशेष गाडी 2 मार्च रोजी मध्यरात्री (बुधवार/गुरुवार) 12.20 ला सीएसटी स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 12 वाजता सावंतवाडी रोड स्थानकात पोहोचेल.

गाडी क्रमंक 01160 विशेष गाडी 3 मार्च रोजी सकाळी 7.10 ला सावंतवाडी रोड स्थानकातून सुटेल आणि त्याच दिवशी सायंकाळी 5.15 ला सीएसटी स्थानकात पोहोचेल.

  • गाडीचे थांबे :

या गाड्यांना  ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळुण, रत्नागिरी, राजापुर रोड, नांदगाव, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ या रेल्वे स्थानकांमध्ये थांबा देण्यात आला आहे.

  • गाडीचे डबे :

1 एसी 2 टायर, 2 एसी -3 टायर, 4 स्लीपर क्लास आणि 9 दुसऱ्या वर्गाचे डबे.

 

तिकिट :

या गाड्यांच्या तिकिटांचे आरक्षण 26 फेब्रुवारीपासून सुरू होणार असून त्यासाठी विशेष शुल्क आकारण्यात येणार आहे.