Breaking News : मोरबे धरण भरले

नवी मुंबईकरांच्या पाण्याचा प्रश्न मिटला

  • स्वप्ना हरळकर /अविरत वाटचाल न्यूज
  • नवी मुंबई, 28 सप्टेंबर 2021 :

नवी मुंबईकरांसाठी मोठी आंनदाची बातमी आहे. गेले काही दिवस सतत पडणा-या दमदार पावसामुळे नवी मुंबईला पाणीपुरवठा करणारे मोरबे धरण 23 सप्टेंबर रोजीच पूर्ण क्षमतेने भरले. धरणाची पाणी पातळी 88 मीटरला पोहोचली. मात्र अद्याप धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु केलेला नाही. दरम्यान,मोरबे धरण पूर्ण क्षमतेचे भरल्यामुळे  नवी मुंबईकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.

गेल्या वर्षी धरण परिसरात पुरेसा पाऊस न झाल्याने धरण भरले नव्हते. यंदाही मोरबे धरण भरेल की नाही, याबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात होते. मात्र पावसाने गेल्या काही दिवसांत जोरदार हजेरी लावल्यामुळे अखेर धरण पूर्ण क्षमतेने भरले. हा पाणीसाठा 26 सप्टेंबर 2022 पर्यंत पुरणार आहे.

Other News On YouTube

मोरबे धरणात आजच्या घडीला 190.890 दशलक्ष घनमीटर म्हणजे 100 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. नवी मुंबई महानगरपालिका हद्दीत आणि सिडकोच्या कळंबोली, कामोठेच्या काही भागांत मोरबे धरणातून पाणीपुरवठा केला जातो. नवी मुंबई आणि परिसरासाठी दिवसाला 470 एमएलडी पाण्याचा वापर केला जातो. 2017 ते 2019 अशी सलग तीन वर्ष पूर्ण क्षमतेनं भरणारे हे धरण मागच्या पावसाळ्यात 2020 मध्ये मात्र पूर्ण भरले नव्हते. त्यामुळे नवी मुंबईकरांना पाणी पुरवठय़ाची चिंता लागून राहिली होती. आता मात्र धऱण भरल्यामुळे नवी मुंबईकरांची ही चिंता मिटली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या मालकीचे मोरबे धरण पूर्ण भरले आहे. मात्र धरण क्षेत्रातील पावसाचा अंदाज घेवून धरणातील पाण्याचा विसर्ग केला जाईल. आवश्यकतेनुसार धरणाचे दरवाजे उघडले जातील.

मनोहर सोनवणे

कार्यकारी अभियंता

पाणी पुरवठा, नवी मुंबई महापालिका

आजची पाण्याची पातळी (28 सप्टेंबर 2021)

  • धरणाची पूर्ण क्षमता – 88 मीटर
  • आजची पाण्याची पातळी 87.97 मीटर
  • 23 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर या काळात 3 सें.मी. ने पाणी साठा कमी झाला. (नियमित पाणी पुरवठयामुळे)
  • धरणक्षेत्रातील पावसाचे एकूण प्रमाण – 3 हजार 742 मि.मि. आजपर्यंत

===================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप