युवकांसाठी 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर याकाळात ऑनलाईन रोजगार मेळावा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 28 सप्टेंबर 2021

जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण कार्यालय ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील उमेदवारांसाठी या दि. 28 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर या दोन दिवसांच्या काळात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

हा मेळावा www.rojgar.mahaswayam.gov.in  या वेब पोर्टलवर होणार असून इच्छुक उमेदवारांनी या पोर्टलवर (नोंदणी केली नसल्यास) जॉबसिकर म्हणून नोंदणी करावी. नंतर जॉब फेअर व इव्हेंट टॅव मधील Online Job fair at Thane from 28 September 2021 to 30 September 2021 ला क्लिक करुन उपलब्ध असलेल्या रिक्तपदाची माहिती पाहून पर्याय निवडावा. त्या नंतर आपला सहभाग नोंदवावा व या रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकासरोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहायक आयुक्त कविता ह. जावळे यांनी केले आहे. अधिक माहिती करीता कार्यालयाच्या 022-25428300 या दूरध्वनीवर संपर्क साधावा.

====================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप