सीवूड येथील डिएव्ही शाळेविरोधातील सर्वपक्षीय आंदोलनाला वाढता पाठिंबा

डिएव्ही शाळेविरोधात कारवाई करण्यास नवी मुंबई महापालिका टाळाटाळ करीत असल्याचा आरोप

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 25 ऑक्टोबर 2021

ऑनलाइन शिक्षणपद्धती सुरू असतानाही इतर एक्टीव्हिटीच्या नावाखाली सीवूड येथील डीएव्ही शाळा अन्यायकारक फी वसुली करीत असल्याचा आरोप करीत भाजपचे माजी नगरसेवक भरत जाधव यांच्या नेतृत्वाखाली बेमुदत उपोषण आजपासून सुरू करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या आंदोलनाला सर्व पक्षीय माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. डिएव्ही शाळेविरोधात वारंवार तक्रारी करूनही नवी मुंबई महापालिका प्रशासनाकडून ठोस कारवाई केली जात नसल्यचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. दरम्यान, या बेमुदत आंदोलनामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून याप्रकरणी नवी मुंबई महापालिका आयुक्त अभिजीत बांगर निदान आता तरी डीएव्ही शाळेविरोधात कोणती भूमिका घेतात, याकडे सर्व नवी मुंबईकरांचे लक्ष लागले आहे.

Other Video On YouTube

DAV शाळेच्या अन्यायकारक आदर ऍक्टिव्हिटी फी वसुलीच्या विरोधात आजपासून सर्वपक्षीय बेमुदत उपोषण सुरू झाले. भाजपाचे माजी नगरसेवक विशाल डोळस, विनोद म्हात्रे, गणेश म्हात्रे, परिवहन समिती सदस्य भालचंद्र वाडकर, समाजसेवक अमित मढवी, निलम मढवी, शिवसेनेचे विशाल विचारे, राष्ट्रवादीचे योगेश कांबळे, मनसेचे अमोल आयवळे,  भाजपाचे विनायक गिरी, आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Other Video On YouTube

सीवूड येथील डी.ए.व्ही स्कूल  ही शाळा ऍक्टिव्हिटी फी च्या नावाखाली आमच्या पाल्यांनी ऑनलाइन शिक्षण घेत असताना न वापरलेल्या सुविधांचे शुल्क वसूल करण्याचा प्रयत्न करत आहे हे लक्षात आल्यावर पालिकेच्या शिक्षण विभागाने उपरोक्त संधर्भाधीन बैठक बोलावली होती. त्या बैठकीत सदर ची  संस्था शैक्षणिक शुल्क ह्या व्यतिरिक्त वसूल करत असलेल्या एक्टिव्हिटी फी रद्द करण्याबाबत सात दिवसांमध्ये निर्णय घेणार असल्याचे आम्हास दिलेले वचन दोन महिने होऊनही अद्याप पूर्ण करत नाही तसेच महापालिका शिक्षण विभाग देखील ह्याबाबत कुठलीही कारवाई करत नाही.

तसेच आम्ही ह्याबाबत सातत्याने महापालिका व राज्यशासन ह्यांचे शिक्षण विभागा कडे तक्रार करत आ. होत, परंतु अद्याप शाळेने सदरची अन्यायकारक ऍक्टिव्हिटी फी पालकांना वेठीस धरून वसूल करने चालूच ठेवले आहे आहे. डी.ए.व्ही स्कूल नेरुळ ह्या शाळेच्या लुटमारीच्या निषेधार्थ 25 ऑक्टोबरपासून शाळेच्या समोर आंदोलन सुरू केल्याची माहिती माजी नगरसेवक भरत जाधव यांनी दिली.

Other Video On YouTube

नवी मुंबई मधील काही शाळांनी सिडकोकडून जनहितार्थ असे भासवून स्वस्तात जमिनी मिळवल्या. मात्र आता त्यांनी शिक्षणाचा बाजार सुरू केला आहे.या विरोधात आपण सर्वांनी एकत्र येऊन लढा उभारणे गरजेचे आहे, आमचे वरील आंदोलन कुठल्याही पक्षाशी संबंधित नसून केवळ आणि केवळ सामान्य पालकांना न्याय मिळवून देण्यासाठी आहे, असेही भरत जाधव यांनी सांगितले.

  • तर अशा शाळांवर कठोर कारवाई करा – समाजसेविका निलम मढवी

सध्या कोरोनामुळे असंख्य पालकांची आर्थिक स्थिती खालावलेली आहे. तरीसुद्धा आपल्या मुलांचे शिक्षण अर्धवट राहू नये म्हणून प्रामाणिक प्रयत्न करतात. मात्र केवळ ऑनलाइन वर्ग सुरू असताना इतर घटकांचीही फी आकारणाऱ्या डीएव्हीसारख्या शाळांना महापालिकेने धडा शिकवण्याची गरज आहे. नाहीतर पालकांना रस्त्यावर उतरून आंदोलन केल्याशिवाय पर्याय उरणार नाही, असा इशारा प्रभाग क्रमांक 109 मधील समाजसेविका निलम मढवी यांनी दिला आहे.

=================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टिक्षेप