मीराभाईंदरचे १० नगरसेवक शिवसेनेतच

शिवसेनेचा दावा, यादी जाहीर

१८ नगरसेवक एकनाथ शिंदे गटासोबत गेल्याचे वृत्त फेटाळले

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 14 जुलै 2022

नवी मुंबई, ठाण्यापाठोपाठ मीरा भाईंदरमधील 18 नगरसेवकांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडून एकनाथ शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्ताने पुन्हा एकदा राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. मात्र मीरा भाईंदरमधील 18  नगरसेवक शिंदे गटात गेल्याचा दावा शिवसेनेने फेटाळला असून १० नगरसेवक उद्धव ठाकरेंसोबतच असल्याचे शिवसेनेतर्फे सांगण्यात आले.

आज मीरा भाईंदरमधील 18 नगरसेवकांनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची साथ सोडत एकनाथ शिंदे गटात सामील होण्याचा निर्णय घेतल्याच्या वृत्ताने एकच खळबळ उडाली.

मात्र शिंदे गटासोबत मीरा भाईंदरचे १८ नगरसेवक गेल्याचे वृत्त खोटे असून गटनेत्यांसह दहा नगरसेवक अद्याप पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासोबतच असल्याचे  शिवसेनेकडून सांगण्यात येत आहे. तशी १० नगसेवकांची यादी शिवसेनेकडून पत्रकारांना देण्यात आली आहे.

शिवसेनेकडून देण्यात आलेली यादी

  1. नीलम ढवण (गटनेत्या)
  2. प्रवीण पाटील
  3. जयंती पाटील

4 तारा घरत

5 स्नेहा पांडे

6 भावना भोईर

7 अर्चना कदम

8 दिनेश नलावडे

9 कटलीन परेरा

10 शर्मिला बगाची

============================================