बोनसरी गावात 75 वर्षीय जेष्ठ नागरिकाच्या हस्ते ध्वजारोहण

डॉ. बाबासाहेब आंबेडकर नालंदा बुध्द विहार संस्थेच्यावतीने कार्यक्रमाचे आयोजन

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 17 ऑगस्ट 2022

स्वातंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवानिम्मित तुर्भे एम. आय. डी. सी. मधील बोनसरी गाव येथे ध्वजारोहण मोठया उत्सहात पार पडले. या वर्षी स्वतंत्र्याच्या 75 व्या अमृत महोत्सवी गावातील 75 वर्षीय जेष्ठ नागरिक श्री. भागवत वाघ यांच्या हस्ते ध्वजारोहन पार पडले.

ध्वजारोहानाचे आयोजन डॉ. बाबासाहेब आंबेडकर नालंदा बुध्द विहार संस्थेच्या वतीने करण्यात आले होते. ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडल्यानंतर संस्थेचे अध्यक्ष  दिपक गायकवाड यांच्या हस्ते सेकडो विद्यार्थी यांना शालेय साहित्य व चॉकलेट – बिस्कीट वाटप करण्यात आले.

ध्वजारोहणाच्या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या सेकडो नागरिकांना ग्रामस्थांच्या वतीने चहा व नाष्ट्या ची वेवस्था करण्यात आली होती.

या कार्यक्रमाला गावातील शालेय विद्यार्थी सह सर्व सामाजिक,धार्मिक, राजकीय कार्यकर्ते – पदाधिकारी यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते दिपक गायकवाड यांनी दिली.