नवी मोर्चेबांधणी ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची आ. मंदा म्हात्रेशी चर्चा

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 5 मे 2024

ठाणे लोकसभा मतदार संघातील उमेदवार जाहीर करण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आ. प्रताप सरनाईक, ठाणे लोकसभेचे उमेदवारी नरेश म्हस्के आणि भाजपच्या बेलापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार मंदा म्हात्रे यांची तातडीची बैठक  घेतली. या बैठकीतील खलबतानंतरच नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली. ठाणे लोकसभा उमेदवारीबाबतचा अत्यंत महत्वाचा निर्णय घेताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवी मुंबईतून भाजपच्या आमदार मंदा म्हात्रे यांना बैठकीला बोलावून भविष्यात नवी मुंबईचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार याचे सूचक संकेत दिले.

LEAD : भाजपची सावध खेळी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाच्या ठाणे लोकसभा उमेदवाराला भाजपच्या नेतृत्वाकडून आधीच हिरवा कंदील मिळाला होता. त्यामुळे नवी मुंबईतून इच्छुक उमेदवार माजी खासदार संजीव नाईक यांना उमेदवारी नाकारल्यानंतर त्याचे काय पडसाद उमटतील याबाबतची चर्चाही या बैठकीत झाल्याचे समजते. त्यानुसार जेव्हा ठाणे लोकसभेची जागा भाजपऐवजी शिंदे गटाच्या शिवसेनेला जाहीर झाली, तेव्हा गणेश नाईक समर्थकांमध्ये संतापाची लाट पसरली आणि त्यांनी तातडीने राजिनामे देण्यास सुरुवात केली.

NEWS : आता पुढे काय ?…

मात्र संध्याकाळपर्यंत भाजपच्याच आ. मंदा म्हात्रे यांच्या समर्थक नगरसेवक आणि  पदाधिकाऱ्यांनी आपण राजिनामा देणार नाही. तसेच पक्षाने दिलेल्या आदेशानुसार एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या पाठीशी  पूर्ण ताकदीने उभे राहणार असल्याचे माजी नगरसेवक दीपक पवार यांनी  स्पष्ट केले. त्यावरून नरेश म्हस्के यांना  नवी मुंबईतून कशाप्रकारचा प्रतिसाद  मिळणार हे यावरून दिसून येते.

NEWS :  ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी एकूण 43 उमेदवारांचे अर्ज दाखल

नरेश म्हस्के यांच्या उमेदवारीला गणेश नाईक गटाच्या समर्थकांनी जाहीर तीव्र  विरोधप्रदर्शन केल्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच नव्हे तर भाजपचेही वरीष्ठ नेते नाराज होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गणेश नाईक समर्थकांच्या आक्रमक विरोधामुळे महायुतीमध्ये आलबेल नसल्याचा संदेश विरोधक पसरवतील, असेही बोलले जात आहे. गणेश नाईक समर्थकांकडून संभाव्य विरोधाची धार लक्षात घेऊनच आ. मंदा म्हात्रे यांनी एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार नरेश म्हस्के यांना पाठींबा जाहीर करीत भाजप नेतृत्वाच्या आदेशाचा मान राखला शिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मर्जीही संपादन करण्याच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकले, असे म्हणायला हरकत नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर निकाल काय लागेल तो लागेल पण नवी मुंबईत राजकीय मोर्चेबांधणी करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आ. मंदा म्हात्रे यांना नक्कीच विश्वासात घेतील याबाबत शंका नाही.

========================================================


========================================================