घणसोली, दिघा, बेलापूर विभागात १३७० नागरिकांची कोव्हीड-१९ मास स्क्रीनिंग

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १५ जून २०२०

कोरोना बाधीतांची साखळी खंडीत करण्यासाठी महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विभागांमध्ये कोव्हीड १९ मास स्क्रिनींग कॅम्प आयोजित करण्यात येत असून १५ जून रोजी घणसोली, दिघा, बेलापूर विभागात कॅम्पमध्ये १३७० व्यक्तींचे मास स्क्रिनींग करण्यात आले.

घणसोली नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून तेरणा रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने चिंचआळी घणसोली कोव्हीड १९ तपासणी शिबीरात १९६ व्यक्तींचे मास स्क्रिनींग केले व कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या ५ व्यक्तींचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले.    

बेलापूर विभागात आग्रोळीगांव येथील सी.बी.डी. बेलापूर महापालिका नागरी आऱोग्य केंद्रासह डॉ. डि.वाय. पाटील रुग्णालयाच्या वैद्यकीय समुहाने ३१७ नागरिकांची व दिवाळेगांव येथे २४ नागरिकांची तपासणी केली तसेच कोरोना सदृष्य लक्षणे आढळणा-या आग्रोळी गांव येथील ३ नागरिकांचे तसेच दिवाळेगांव येथील ११ नागरिकांचे स्वॅब कलेक्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे रामनगर दिघा विभागात इलठणपाडा महापालिका नागरी आरोग्य केंद्रासह अमृत प्रेरणा सेवाभावी संस्था यांच्या वैद्यकीय समुहाने ९३३ नागरिकांचे घरोघरी जावून मास स्क्रिनींग केले.

 

१६ जून रोजी वाशी विभागात जुहुगांव तसेच सेक्टर १५,१६ त्याचप्रमाणे सेक्टर ६ घणसोली आणि रामनगर दिघा भागात कोव्हीड १९ मास स्क्रिनींग कॅम्प राबविण्यात येत आहेत.

=================================================

  • इतर बातम्यांचाही मागोवा