दहीहंडी निमित्त ठाण्यातील वाहतुकीत मोठे  बदल

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • ठाणे, 18 ऑगस्ट  2022

दही हंडी निमित्त ठाणे शहरातील विविध भागातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आले असल्याची माहिती वाहतूक शाखेचे उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.

 प्रवेश बंद 

पूर्व द्रुतगती महामार्गावरून कोपरी ब्रिज, तीनहात नाका, धर्मविर नाका-नितीन कंपनी नाका येथून ठाणे शहरात (वंदना बस स्टॉप-स्टेशन बाजूस) येणाऱ्या एस.टी. टीएमटी, बीईएसटी व खाजगी बसेसना नमूद नाक्यांवरून आत येण्यास व ठाणे स्टेशन कडून वर नमूद नाक्यांमार्गे जाण्यास “प्रवेश बंद” करण्यात आली आहे.

पर्यायी मार्ग

सदरच्या सर्व बसेस कॅडबरी नाका खोपट नाका-आंबेडकर रोडने जी.पी.ओ. नाक्याकडे तसेच गोल्डन डाईज नाका मार्गे मिनाताई ठाकरे चौक कडून जी.पी.ओ. नाक्यावरून कोर्ट नाका-आबेडकर पुतळा-जांभळी नाका भाजी मार्केट मार्गे ठाणे पूर्व स्टेशन बाजूकडे जातील.

प्रवेश बंद

ठाणे स्टेशन सॅटीस ब्रिजवरून टॉवर नाक्याचे दिशेने जाणाऱ्या एस.टी./ टीएमटी बसेसना सॅटीस ब्रिज येथे प्रवेश बंद करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

सदरच्या सर्व बसेस हया ठाणे रेल्वे स्टेशन कडुन सॅटीज ब्रिजवरुन दादा पाटील वाडी मार्गे गोखले रोडने टेलीफोन नाका-तिनहात नाक्या कडून इच्छित स्थळी जातील.

प्रवेश बंद

 सर्व गोविंदा पथकाच्या वाहनाना कोपरी ब्रिज नाका, तीनहात नाका, धर्मविर नाका-नितीन कंपनी नाका, कॅडबरी नाका येथून ठाणे शहराच्या अंतर्गत भागात व स्टेशन बाजूस जाणाऱ्या वाहनांस नमूद नाक्यांवर “प्रवेश बंद” करण्यात येत आहे.

पर्यायी मार्ग

सदरची सर्व वाहने हे पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या सर्व्हिस रोडवर पार्किंग करण्यात येतील.

नो पार्किंग ठाणे महानगरपालिका भवन ते अल्मेडा चौक ते महापालिका भवन ते ओपन हाउस आराधना कॉस, ओपनहाउस ते भक्ती मंदिर या दरम्यान रस्त्याचे दोन्ही बाजूस सर्व प्रकारच्या वाहनांनसाठी “नो पार्किंग ” करण्यात येत आहे. टॉवर नाका गडकरी रंगायतन-बोटींग क्लब पर्यंत मासुंदा तलावाचे (तलावपाळी) रोडचे दोन्ही बाजूस सर्व प्रकारची वाहने पार्किंग करण्यास मनाई करण्यात येत आहे.

सदरची अधिसुचना ही फायरब्रिगेड, रूग्णवाहिका, पोलीस वाहने व इतर अत्यावश्यक सेवेतील वाहनाना लागू राहणार नाही. सदरची अधिसुचना ही 18 ऑगस्ट 2022 रोजी सकाळी 7 ते  रात्री11  पर्यंत अमलात राहील, असे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त दत्तात्रय कांबळे यांनी कळविले आहे.