राष्ट्रवादी काँग्रेसच्या इंजिनिअर, ॲग्रीकल्चर पदवीधर सेलची येत्या महिनाभरात स्थापना करणार

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, २८ सप्टेंबर २०२२

राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून इंजिनिअर आणि ॲग्रीकल्चर पदवीधर सेल या दोन सेलची स्थापना करण्याचा निर्णय काल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिली.

इंजिनिअर सेलच्या माध्यमातून राज्यातील इंजिनिअर तरुणांना संघटीत करण्याचे काम होणार आहे तर राज्यात लाखो ॲग्रीकल्चर पदवीधर असून त्यांना एकत्रित करून शेतीतील नवीन ज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचवण्याचा निर्णय झाला. येत्या महिनाभरात या दोन्ही सेलची प्रत्येक तालुक्यात संघटना बांधणीचे काम राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरून करणार असल्याचे जयंत पाटील यांनी सांगितले.