द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजामधील पाणी पुरवठा 22 फेब्रुवारीपासून 24 तासांसाठी बंद

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 20 फेब्रुवारी 2023

सिडकोतर्फे हेटवणे जलवाहिनीच्या देखभाल व दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार असल्याने द्रोणागिरी, उलवे, खारघर, तळोजा नोडसह हेटवणे जलवाहिनीवरील गावांना होणारा पाणी पुरवठा 22 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजल्यापासून 23 फेब्रुवारीच्या सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तसेच त्यानंतरही पुढील 24 तास कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे.

तरी प्रभावित परिसरातील नागरिकांनी यापूर्वीच पाण्याचा साठा करून, या कालावधीत पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन सिडकोतर्फे करण्यात आले आहे.

=====================================================

  • अविरत वाटचाल YOUTUBE CHANNEL

========================================================

  • अविरत वाटचाल वर्तमानपत्र