ज्वेल ऑफ नवी मुंबईची झाली घसरगुंडी

छायाचित्र सौजन्यः अमित मढवी

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 24 जुलै 2023

उद्यानांचे शहर अशी बिरुदावली मिरवणाऱ्या नवी मुंबई महानगरपालिकेचे उद्यानातील गैरसोयींकडे दुर्लक्ष झाले आहे. नवी मुंबई, पनवेलसह आजुबाजूच्या उपनगरांमध्येही नागरिकांना आकर्षित करणाऱ्या ज्वेल ऑफ नवी मुंबई (jewel of navi mumbai) या उद्यानाचीही दुरवस्था झाली आहे. सध्या पावसाळा सुरू असून उद्यानातील मार्गिकेवर मोठय़ा प्रमाणात शेवाळे जमा झाल्यामुळे नागरिक पाय घसरून पडण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ज्वेल ऑफ नवी मुंबई (jewel of navi mumbai)या उद्यानातील पदपथ घसरगुंडी बनत असल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात असून महापालिका प्रशासनाने तातडीने उद्यानातील शेवाळयुक्त मार्गिका त्वरीत स्वच्छ करावी, अशी मागणी भाजपचे नेरुळ- सीवूड विभागातील युवा नेते अमित मढवी यांनी केली आहे.

नवी मुंबईतले महत्वाचे पर्यटन स्थळ म्हणून नेरूळ इथल्या ज्वेल ऑफ नवी मुंबई (jewel of navi mumbai)या उद्यानाकडे पाहिले जाते. या उद्यानात केवळ पर्यटकच नव्हे तर अनेक कुटुंबही फेरफटका मारण्यास येत असतात. सकाळ, संध्याकाळ चालण्याचा व्यायाम करणा-या लहान, तरुण तसेच ज्येष्ठ नागरिकांचीही संख्या मोठी आहे. अशावेळी या उद्यानात चालण्याचा मार्ग हा सुस्थितीत असणे आवश्यक आहे. मात्र उद्यानातल्या फारश्या तुटल्या असून मार्गिकेवर पावसाळ्यामुळे मोठय़ा प्रमाणात शेवाळे निर्माण झाले आहे. शेवाळमुळे मार्गिका बुळबळीत झाल्या असून चालताना अथवा धावताना पाय घसरुन दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

उखडलेल्या फरश्यांवर पाय पडला की पावसाळा असो वा नसो चिखलाचं पाणी आपल्या अंगावर उडतेच. त्यामुळे या ठिकाणी चालताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. ज्वेल ला प्रवेश केल्यावर लागणारा मोकळा परिसर आहे. इथे हि-याची प्रतिकृती उभारली आहे. या भागाच्या समोर असणा-या भुयारात पावसाचे पाणी साचलेले असते. यामध्ये कचराही मोठ्या प्रमाणात अडकलेला आहे. त्यामुळे या भागात मच्छर वाढण्याची शक्यता आहे. नागरिकांना बसण्यासाठी असलेली  अनेक बाकडी तुटली आहेत. नागरिकांना या सर्व समस्यांचा सामना करावा लागत असून महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी स्वतः लक्ष घालून  ज्वेल ऑफ नवी मुंबई (jewel of navi mumbai) या उद्यानाची उद्यान विभागाला
तातडीने देखभाल करण्याचे निर्देश द्यावेत .
-अमित मढवी 
भाजप युवा नेते, नेरुळ-सीवूड विभाग

========================================================

  • मागील बातम्यांवरही दृष्टक्षेप

========================================================