कोंढाणे धरणाचे काम पूर्ण करणार

आमदार प्रशांत ठाकूर ठाकूर यांची ग्वाही

 पनवेल, 8 मे 2017:

पनवेल शहराला 24 तास पाणी पुरवठा करणे आपले प्रमुख ध्येय आहे. त्यासाठी कर्जत तालुक्यातील कोंढाणे धरणाचे काम पूर्ण करण्याला आपण प्राधान्य देणार असल्याची ग्वाही आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. प्रभाग १२ येथील जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन आणि पक्षप्रवेश कार्यक्रमात ते बोलत होते. कामोठ्यात विविध विकासकामांची पूर्तता भाजपच्या पाठपुराव्यामुळेच झाली असल्याने भाजप युतीला मते मागण्याचा अधिकार आहे असेही ते म्हणाले.

भाजप आरपीआय युतीने प्रचारात आघाडी कायम ठेवत जनसंपर्क कार्यालयांच्या उदघाटनांचाही सपाटा लावला आहे.पनवेल नागरपरिषद, सिडको वसाहती आणि ग्रामपंचायती असे मोठे क्षेत्र असलेल्या पनवेल महापालिकेच्या प्रथम निवडणुकीची रणधुमाळी वाजलेले आहे. भाजपमध्ये दिवसेंदिवस प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्याही वाढत चालली आहे. काल कामोठे येथील प्रभाग १२ च्या भाजपयुतीच्या जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.  यावेळी रिपाईचे जिल्हाध्यक्ष तथा प्रभाग क्रमांक १२ चे उमेदवार जगदीशभाई गायकवाड,कुसुम म्हात्रे,पुष्पा कुत्तरवडे,दिलीप पाटील,कामोठे भाजप शहराध्यक्ष डॉ. अरुणकुमार भगत,विकास घरत, राजेश गायकर, तानाजी पाटील, सुशील शर्मा,विद्या तामखेडे,हरबिंदर कौर,तानाजी पाटील,हर्षवर्धन पाटील,जगन पावणेकर,गोपीनाथ भगत यांच्यासह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

स्वच्छ आणि पारदर्शक कारभारासाठी भाजप आरपीआय युतीला महापालिकेची सत्ता हवी आहे. कामोठे ग्रामपंचायतीचा पनवेल महापालिकेत समावेश केवळ भाजप आरपीआय युतीच्या आग्रही मागणीमुळेच झालेला आहे. येथील  क्रीडांगणे,उद्याने,रस्ते याबाबत भाजपने केलेल्या पाठपुराव्यामुळेच झालेली आहेत. कामोठ्याची पाण्याची गरज ओळखण्यासाठी ऑडिट करण्याची मागणी भाजपने सिडकोकडे लावून धरली होती. पनवेल महापालिका हद्दीतील नागरिकांना अविरत पाणीपुरवठा देण्यासाठी भाजप युती कटिबद्ध आहे असे प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.

या कार्यक्रमात किरण इंगळे, सचिन झांबरे, संजय शेळके, श्रीधर रेवले, सचिन साळुंखे, आणि बोन्झर इमारतीतील शेकापचे कार्यकर्ते तसेच महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष विशाल तांबे यांच्यासह सुधीर निकम, बाळासाहेब सातपुते, मोहन फडतरे, सतीश जाधव, स्वप्नील येवले, विनय यादव, लहू साळुंखे, लक्ष्मण जगताप, ज्ञानेश्वर पापकर, यलोबा सत्रे, आबा जाधव यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला.