उलवे सेक्टर 12 येथे स्मशान भूमीचे निर्माण

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 4 सप्टेंबर 2023

नवी मुंबई शहराला अगदी खेटून असणाऱ्या तसेच वेगाने विस्तारणाऱ्या उलवे परिसरात विविध नागरी सोयी सुविधा निर्माण करण्यात येत असून उलवे सेक्टर 12 येथे नव्याने स्मशान भूमी उभारण्यात आली आहे. या नवीन स्मशान भूमीमुळे उलवे नोडमधील नागरिकांची सोय होणार आहे.

रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत, उपसरपंच सचिन घरत यांच्या प्रयत्नांनी आणि  प्रमुख उपस्थितीत तसेच नागरिकांच्या उपस्थितीत ही स्मशान भूमी नागरिकांच्या सेवेसाठी खुली करण्यात आली आहे.

यावेळी  राजेंद्र घरत (उप अद्यक्ष भात गिरणी तालुका पनवेल ), रोशन म्हात्रे (सदस्य ग्रामपंचायत ), सचिन राजे येरुणकर अरुण कोळी (सदस्य ग्रामपंचायत ), राकेश घरत (अद्यक्ष सेक्टर 8/9), रचना सचिन राजे येरुणकर, संदीप पाटील, विनोद थोरात, रमेश खंडू , रोहन खंडू ,  संदीप नलावडे,  प्रदीप नलावडे, विशाल पार्टे,  भातालकर, मुकेश मोरे, मिलिंद डोके,  दिलीप पाटील,(अद्यक्ष आम्ही उलवेकर महिला मंडळ ), निशिगंधा शेलार, सरिता साळवे, उषा डे,  सविता दवे, कीर्ती फटाक, नम्रता मुरकर, अनुष्का घागरे आणि आम्ही उलवेकर मित्र मंडळ आणि समस्त रहिवाशी उपस्थित होते.

========================================================