ठाण्यात 3 हजार घरे बांधणार

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ठामपाच्या 414 कोटींचे प्रकल्प

ठाणे, 27ऑगस्ट 2017/AV News Bureau:(housing scheme in thane)

प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ठाणे महानगरपालिकेने केंद्र शासनाच्या केंद्र स्तरीय सुकाणू समितीला सादर केलेल्या एकूण 414 कोटी रूपयांच्या ४ प्रकल्पांना नुकतीच मंजुरी दिली. या मान्यतेमुळे सर्वांसाठी घरे या योजनेतंर्गत एकूण 3000 घरे बांधण्यात येणार आहेत.(housing scheme in thane)

ठाणे महानगरपालिकेने बेतवडे, म्हातर्डी आणि पडले अशा एकूण शासनाच्या जागेवरील चार ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ४ प्रकल्प अहवाल सादर केले होते. एकूण 414 कोटी रूपयांच्याया चार प्रकल्प अहवालांना राज्याचे गृहनिर्माण सचिव यांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरिय सुकाणू समितीने जून 2017 मध्ये मंजूरी दिल्यानंतर नियमानुसार सदर प्रकल्प अहवाल केंद्रीय सुकाणू समितीकडे मान्यतेसाठी सादर केला होता. या समितीची दिनांक 23 आगस्ट रोजी झालेल्या बैठकीत ठाणे महानगरपालिकेच्या 4 प्रकल्पांच्या एकूण 414 कोटी रूपयांच्या प्रकल्पांना या समितीने मान्यता दिली.(housing scheme in thane)

ठळक मुद्दे (housing scheme in thane)

  • या योजनेतंर्गत बेतवडे येथे दोन प्रकल्प, म्हातर्डी आणि पडले येथे प्रत्येकी एक प्रकल्प असे एकूण चार प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.
  • योजनेतील४० टक्के घरे ही प्रकल्प बाधितांसाठी, ४० टक्के घरे परवडणारी घरे या योजनेखालील असणार आहेत.
  • २० टक्के घरे ही मध्यम उत्पन्न गटातील व्यक्तींना महापालिकेच्यावतीने नियुक्त करण्यात येणा-या विकासकाच्या माध्यमातून निश्चित करण्यात येणा-या दरात विकण्यात येणार आहेत.
  • या प्रकल्पासाठी केंद्र सरकाराकडून प्रति घर १.५ लाख, राज्य शासनाकडून १ लाख रूपये मिळणार असून प्रकल्प बाधित लाभार्थींना १ लाख रूपये भरावे लागणार आहेत.