बहुसंख्य हिंदु समाज मोदी व भाजपाविरोधात, भाजपा उरला केवळ गुजरात, उत्तर प्रदेशात – कुमार केतकर

 

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 7 सप्टेंबर 2023

२०१४ साली लोकसभा निवडणुकीत भाजपाला ३१ टक्के मते मिळाली होती तर २०१९ साली ३७ टक्के मते मिळाली होती, याचा अर्थ बहुसंख्य हिंदु समाज भाजपा व मोदी यांच्याविरोधात आहे. दक्षिण भारतात भाजपा कुठेच नाही, पश्चिम बंगाल, बिहारमध्येही नाही. भाजपा हा फक्त गुजरात व उत्तर प्रदेश राज्यापुरताच मर्यादित राहिला आहे, अशी टीका खासदार कुमार केतकर यांनी पत्रकार परिषदेत केली.

‘भारत जोडो’ यात्रेच्या वर्धापन दिनानिमित्त टिळक भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेला नसीम खान आणि राज्यसभा खासदार कुमार केतकर यांनी संबोधित केले. यावेळी केतकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर टीका केली.

खासदार केतकर पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सर्व निर्णय चुकीचे ठरले आहेत. नोटबंदीचा निर्णय फसला, नोटबंदीने देशातील छोटे, लघु, मध्यम व्यापारी संपले, काळा पैसा आला परत आला नाही, नक्षलवाद, आतंकवाद संपला नाही, त्यामुळे पुलवामा व बालाकोटवरील सर्जिकल स्ट्राईकच्या नावावर मोदींनी मते मागितली.

या पत्रकार परिषदेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रवक्ते भरत सिंह उपस्थित होते.

========================================================

========================================================