मुंबई विमानतळावर 20 कोटी रुपयांचे कोकेन जप्त

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई,  26 मार्च 2024

नैरोबीहून मुंबईला आलेल्या महिलेला मुंबई विमानतळावर अटक करून तिच्याकडील तब्बल २० कोटी रुपये किंमतीचे कोकेन जप्त करण्यात आल्याची घटना घडली आहे.

लीड स्टोरी : आर्थिक फसवणूक आणि सायबर गुन्हयांवर लक्ष

नैरोबीहून मुंबईला आलेल्या आणि सिएरा लिओनचे नागरिकत्व असणाऱ्या एका महिला प्रवाशाला महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (DR)I अधिकाऱ्यांनी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज विमानतळावर, रविवार 24 मार्च  रोजी ताब्यात घेतले. या महिला प्रवाशाच्या सामानाची तपासणी केली असता तिच्या सामानातील बुट, मॉइश्चरायझरची बाटली, शॅम्पूची बाटली आणि अँटी-पर्स्पिरंट्स या सर्व वस्तूंमध्ये मोठ्या शिताफीने लपवलेली पांढरी पावडर आढळून आली. फील्ड टेस्ट किटचा वापर करून या पदार्थाची चाचणी केल्यावर त्यात कोकेन असल्याचे स्पष्ट झाले.

लीड स्टोरी : किनारपट्टी सुरक्षेसाठी सागर रक्षक एप (App)

एकूण 1979 ग्रॅम पांढऱ्या पावडरच्या रुपातील जप्त करण्यात आलेल्या कोकेनचे बाजार मूल्य अंदाजे 19.79 कोटी आहे. यावेळी या महिला प्रवाशाने आपला जबाब नोंदवल्यानंतर तिला अटक करण्यात आली.त्यानंतर तिला न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा  पुढील तपास सुरू आहे.

विशेष लेख:  निसर्ग समजून घ्यावाच लागेल

========================================================


========================================================