मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांच्या वतीने महा रक्तदान शिबिर

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
    मुंबई, 7 मार्च 2024 

महाराष्ट्र पोलीस दलाच्या मुंबई पोलीस 2003 बॅचच्या वतीने २१ व्या वर्षपूर्ती निमित्त नागपाडा इथल्या झिनत हॉल इथे रोटरी क्लब आणि ट्रायम्प ब्लड बॅंक यांच्या संयुक्त विद्यमाने नुकतेच महा रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबीर घेण्यात आले. या शिबिरात 2003 च्या बॅचचे सर्व पोलीस कर्मचारी, त्यांचे कुटुंबिय उपस्थित होते.

यानिमित्ताने घेण्यात आलेल्या महा रक्तदान शिबिरात ४० बॅगा रक्त रोटरी क्लब ठाणे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आल्या. पोलीस कर्मचारी आणि नागरिकांसाठी माधवबाग यांच्या सहकार्याने घेण्यात आलेल्या आरोग्य तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. गरजू आणि निराधार कुटुंबियांकरिता मोफत कपडे हा उपक्रम घेण्यात आला होता. त्यालाही चांगला प्रतिसाद मिळाल्याने ३ बॅगा कपडे दान करण्यात आले.

========================================================


========================================================

========================================================