सीएसएमटी स्थानकात लोकल सुरळित सुरू

सीएसएमटी स्थानकात घसरलेला डबा हटवला

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • मुंबई, 29 एप्रिल 2024

पनवेल हून सीएसएमटी जा जाणा-या लोकलचा एक डबा आज सकाळी साडेअकराच्या सुमाराल रेल्वे रूळावरून घसरला. सीएसएमटी स्थानकातल्या फलाट क्रमांक 2 साठी लोकल स्थानकात प्रवेश करत असताना हा अपघात झाला. यामध्ये कोणीही प्रवासी जखमी झाले नाहीत. या अपघातामुळे हार्बर मार्गावरील लोकल सेवा काही काळासाठी विस्कळीत झाली होती. अखेर दुपारी सव्वा एकच्या सुमारास रूळावरून घसरलेला हा डबा पुन्हा रूळावर आणण्यात रेल्वेला यश आले आणि दुपारी 2 च्या सुमारास या मार्गावरून लोकल वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली आहे.

अपघातानंतर हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वडाळा मार्गावरील लोकल सेवा तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आली होती.
———————————————————————————