सेनादलाच्या सहभागातून स्वच्छता मोहीम

नवी मुंबई / AV News Bureau :

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नेव्ही दिन व सशस्त्र सेना ध्वज दिनाचे औचित्य साधून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये ते 15 डिसेंबर 2016 या काळात सशस्त्र सेनादलाच्या सहभागातून स्वच्छता विषयक विशेष कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले.

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत  बेलापुर विभाग क्षेत्रातील सरोवर विहार, सेक्टर-11 येथील भारतीय तटरक्षक, रक्षा मंत्रालय येथे महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी व तटरक्षक दलाचे कमांडर यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष स्वच्छता मोहिम राबविण्यात आली.

सदर मोहिमेमध्ये सागरीतट दलाचा परिसर स्वच्छ करण्यात आला. यावेळी सागरी पर्यावरण संरक्षणाविषयी माहिती व प्रबोधन करण्यात आले. या मोहिमेमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेचे परिमंडळ 1 चे उप आयुक्त दादासाहेब चाबुकस्वार, बेलापुर विभागाचे विभाग अधिकारी सुभाष अडागळे, स्वच्छता निरीक्षक रविंद्र चव्हाण , मिलिंद तांडेल तसेच  तट रक्षक दलाचे कमांडर श्रीवास्तव, कर्मचारी व स्वच्छाग्रही उपस्थित होते.