रेल्वेची ज्येष्ठांना आधार सक्ती

नवी  दिल्ली, 6 डिसेंबर 2016 /AV News News Bureau:

रेल्वे तिकीटामध्ये सवलत हवी असल्यास ज्येष्ठ नागरिकांना आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. रेल्वे मंत्रालय ज्येष्ठ नागरिकांसाठी आधार कार्डावर आधारीत तिकीट यंत्रणा राबविणार आहे. दोन टप्प्यात ही योजना राबविण्यात येणार आहे.

58 वर्षांवरील महिला आणि 60 वर्षांवरील पुरूषांना रेल्वे तिकीटांमध्ये सवलत देण्यात येते. मात्र आता ही सवलत सेवा हवी असल्यास ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड सक्तीचे करण्यात येणार आहे. आधार कार्ड दाखविल्यानंतरच रेल्वे तिकीटामध्ये सवलत मिळणार आहे.  यानुसार 1 जानेवारी ते 31 मार्च 2017  या काळात ज्येष्ठ नागरिकांसाठी तिकीट काढावयाचे असल्यास ऐच्छिक स्वरुपात त्यांचा आधार क्रमांक द्यावा लागणार आहे. मात्र 1 एप्रिल 2017 पासून सवलतीच्या तिकीटासाठी ज्येष्ठ नागरिकांना आधार कार्ड क्रमांक बंधनकारक असणार आहे.

दरम्यान, तिकीट वितरणामध्ये अधिक पारदर्शकता असावी यासाठी भविष्यात सर्वच तिकिटांचे आरक्षण आधार कार्डावर आधारीत असणार आहे.