विराज प्रभू व ऋतुजा उदेशी खुल्या गटाचे विजेते

नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धा

नवी मुंबई,12 डिसेंबर 2016 /AV News Bureau :

नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने दि. 10 व 11 डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेच्यु खुल्या गटाचे विजेतेपद विराज प्रभू (पुरूष) आणि ऋतुजा उदेशी (महिला) यांनी पटकावले. सहा गटात खेळवण्यात आलेल्या या जलतरण स्पर्धेत तब्बल 250 स्पर्धकांनी भाग घेतला होता.

पारितोषिक वितरण समारंभप्रसंगी महापौर सुधाकर सोनवणे यांच्यासह सभागृहनेते  जयवंत सुतार, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम समिती सभापती लिलाधर नाईक, क्रीडा अधिकारी रेवप्पा गुरव, शिवछत्रपती पुरस्कार विजेते जलतरणपटू गोकुळ कामथ, क्रीडा प्रशिक्षक धनंजय वनमाळी आदी मान्यवर उपस्थित होते.

घणसोलीत महापालिकेचा तरणतलाव उभारणार

महानगरपालिकेच्या वतीने घणसोली येथे तरण तलाव बांधण्यात येत असून पुढील वर्षीच्या स्पर्धा महापालिकेच्या तरण तलावात आयोजित करण्यात येतील असा विश्वास महापौर सुधाकर सोनवणे यांनी व्यक्त केला. नागरिकांना परवडणा-या दरात हा तरण तलाव उपलब्ध असेल असेही त्यांनी सांगितले.

यावेळी  मान्यवरांच्या हस्ते 6 वयोगटात प्रत्येकी 5 जलतरण प्रकारातील अनुक्रमे तीन विजेत्यांस सुवर्ण, रौप्य व कांस्य पदक प्रदान करून पारितोषिक रक्कम आणि प्रमाणपत्रासह सन्मानीत करण्यात आले.

वयोगट निहाय विजेते

  1. 8 वर्षे वयोगट

रोहन अंबुरे व आर्या गाडे अनुक्रमे मुले व मुलींमध्ये चॅम्पियन्स ठरले.

  1. 10 वर्षे वयोगट

ऋषभ दास व सावर अकुस्कर यांनी अनुक्रमे मुले व मुलींची चॅम्पियनशीप पटकाविली.

  1. 12 वर्षे वयोगट

क्रिश कटिजा आणि अश्नी जोशी हे अनुक्रमे मुले व मुलींच्या चॅम्पियनशीपचे मानकरी ठरले.

  1. 14 वर्षे वयोगट

ध्रुव पटेल आणि पायल श्रीराव हे अनुक्रमे मुले व मुलींच्या चॅम्पियनशीपचे मानकरी ठरले.

  1. 17 वर्षे वयोगट

मुलांमध्ये सिध्दार्थ खोपडे तर मुलींमध्ये आदिती कदम यांनी संपादन केली.

  1. खुला गट

विराज प्रभू खुल्या पुरूष गटाचे तर ऋतुजा उदेशी खुल्या महिला गटाचे चॅम्पियन्स ठरले.

ई – गव्हर्नन्स उपक्रम

  • नवी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील तसेच नवी मुंबई पोलीस आयुक्तालय परिक्षेत्रातील 250 हून अधिक विविध वयोगटातील जलतरणपटू या स्पर्धेत भाग घेतला होता. नवी मुंबई महापौर चषक जलतरण स्पर्धेची पारितोषिक रक्कम विजेत्या जलतरणपटूंच्या बँक खात्यात थेट जमा होणार असल्याने नवी मुंबई महानगरपालिकेने ई-गव्हर्नन्सच्या दृष्टीने आणखी एक यशस्वी पाऊल उचलले आहे.