रघुलीला मॉलमधील स्पामध्ये सुरु असलेले सेक्स रॅकेट उध्वस्त

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, 20 फेब्रुवारी 2024 

वाशी येथील रघुलीला मॉलमधील एका स्पा वर धाड टाकून नवी मुंबई पोलिसांनी वेशा व्यवसायाचे रॅकेट उध्वस्त  केले. या कारवाईत दोन महिलांची सुटका करण्यात असून स्पाची मालक असणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गजबजलेल्या मॉलमध्ये अनैतिक वेश्या व्यवसायाचे रॅकेट उघडकीस आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वाशी सेक्टर ३० येथील रघुलीला मॉलमधील पर्ल नावाच्या स्पामध्ये वेशाव्यवसाय सुरु असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे वरिष्ठ पोलीस  निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांना मिळाली होती. मिळालेल्या प्राथमिक माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक घोरपडे यांनी सखोलपणे चौकशी केली असता माहितीमध्ये तथ्य असल्याचे आढळून आले.

याप्रकरणी पोलीस आयुक्त तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना  याबाबतची माहिती दिली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार आज दुपारी ३ च्या सुमारास पोलीस निरीक्षक घोरपडे यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने सापळा रचला आणि बनवाट ग्राहक  पाठवून  सदर स्पामध्ये वेश्या व्यवसाय चालत असल्याच्या माहितीवर शिक्कामोर्तब केले. त्यानंतर धडक कारवाई करून तेथे काम करीत असलेल्या दोन पिडीत महिलांची सुटका करण्यात आली.


पोलिसांनी स्पाची मालक आणि मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या सजनी किशोर फकीर या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपी सजनी फकीर ही दोन्ही महिलांकडून त्यांच्या इच्छेविरोधात वेश्या व्यवसाय करायला भाग पाडत असे आणि त्यातून मिळणाऱ्या पैशातून स्वतःची उपजिविका भागवित असल्याचे पोलीस तपासात आढळून आले. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातमी वाचा : कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ २४ व २५ फेब्रुवारी ऐवजी २९ फेब्रुवारी ते १ मार्च रोजी होणार

ही धडक कारवाई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे, पोलीस उपनिरीक्षक हरद भस्गुडे, पोलीस कर्मचारी मांडोले, चौधरी, ठाकुर, चव्हाण, पारासुर, महिला पोलीस कर्मचारी तांडेल, म्हात्रे, अडकमोल, वाहन चालक मन्वार आदींनी भाग घेतला होता.

बातमी  वाचा : पालकांनी शाळेत जाण्यास मनाई केल्यामुळे रागात घर सोडलेल्या 5 मुलींना दिल्लीतून परत आणण्यात पोलिसांना यश

========================================================


========================================================

========================================================