अर्बन हाट येथे राष्ट्रीय हस्तकला प्रदर्शन

नवी मुंबई,19 डिसेंबर 2016 / AV News Bureau :

बेलापूर येथील  सिडको अर्बन हाटमध्ये 16 ते 25 डिसेंबर या कालावधीत राष्ट्रीय हस्तकला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रदर्शनात 13 राज्यातील 80 पेक्षा जास्त कारागिर सहभागी झाले आहेत. हे प्रदर्शन वस्त्रोद्योग मंत्रालय नवी दिल्ली व विकास आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केले आहे.

  • प्रदर्शनाचे आकर्षण

या प्रदर्शनात हस्त कलेच्या वस्तू, भरतकाम केलेल्या साडया, ज्युटच्या वस्तू, बांबू फर्निचर, लाकडी वस्तू, लेदरच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, बुट, खेळणी, ड्रेस मटेरीयल, साडी, बेडशीट, कारपेट, पडदे इत्यादी वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत. या प्रदर्शनात आंध्रप्रदेश, छत्तीसगड, अरुणाचलप्रदेश, गोवा, तामिळनाडू, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, ओरीसा, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, हरियाणा, आदी राज्यातील कारागिरांनी बनविलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री असणार आहे.

  • आतापर्यंत 106 कार्यक्रम

सिडको भारत सरकारतर्फे आयोजित करण्यात आलेले  हे तिसरे हस्तकला प्रदर्शन आहे. सिडको अर्बन हाटमध्ये आतापर्यंत 106 कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यामध्ये 23 राज्यातील 9 हजारपेक्षा जास्त कारागिरांनी सहभाग नोंदविला आहे.