पनवेलमध्ये उद्या वीज पुरवठा बंद

नवी मुंबई,19 डिसेंबर 2016 /AV News :

 विद्युत पुरवठ्याबाबतचे तांत्रिक काम पुर्ण करण्यासाठी महावितरण कंपनीच्या पनवेल विभागातील वीज वाहिनींचे २० डिसेंबर रोजी पनवेल विभागाच्या काही परिसराचा वीजपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

२२ के.व्ही. गव्हाण या वीज वाहिनीवरून  ओवळे, कुंडेवहाळ, वाघिवली, वरचे ओवळे, चिंचपाडा, वडघर, कोल्हीकोपर, विठ्ठलवाडी, तळेवाडी, से.२ व से.२ अ करंजाडे, पारगांव, गव्हाण, न्हावा व इ.गावे आदी परिसराचा वीजपूरवठा करण्यात येतो.तर  २२ के.व्ही. पारगांव या वीज वाहिनीवरून करंजाडे, मानघर, बेलवाडी, पाटनेली, गराडा, दापोली, पाडेघर व इ.गावे आदी परिसराचा वीजपूरवठा करण्यात येतो. त्याचप्रमाणे  २२के.व्ही. भिंगारी-२ या वीज वाहिनीवरील २२ के.व्हीमारर्फत पनवेल-३, कर्नाळा, कोळखा, पारंगाव, नेरे आदी परिसराचा वीजपूरवठा करण्यात येतो. मात्र तांत्रिक कामामुळे  सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०६.०० वाजेपर्यंत बंद या वीज वाहिनीवरून होणारा विद्युत पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच २२के.व्ही. ओएनजीसी-२ या वीज वाहिनीवरील उरण शहराचा काही भाग आणि करंजा प्रभाग आदी परिसराचा वीजपूरवठा तसेच ३३ के.व्ही. खारघर कामोठे या वीज वाहिनीवरील कामोठे नोड आदी परिसराचा वीजपूरवठा सकाळी १०.०० ते संध्याकाळी ०५.०० वाजेपर्यंत बंद राहणार आहे. तरी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन वितरण कंपनीतर्फे करण्यात आले आहे.