प्री स्कूल लीग इव्हीएस स्पर्धेत नवी मुंबईच्या स्वरांश कोळीचे घवघवीत यश

  • अविरत वाटचाल न्यूज नेटवर्क
  • नवी मुंबई, १५ डिसेंबर २०२०

प्रीस्कूल स्कूल लीग इव्हीएस या राष्ट्रीय पातळीवर खेळवल्या गेलेल्या स्पर्धेत नवी मुंबईचा स्वरांश कोळी याने घवघवीत यश संपादन केले आहे. मास्टरमाइंड संस्थेतर्फे खेळवल्या गेलेल्या या स्पर्धेत स्वरांश कोळी यांनी ए प्लस ग्रेड मिळवली.

स्वरांश कोळी हा बेलापूर येथील भारती विद्यापीठ शाळेत शिकतो. ५ सप्टेंबर रोजी झालेल्या या राष्ट्रीय स्पर्धेत स्वरांश कोळी याने मिळवलेल्या यशाबद्दल त्याचे सर्व थरातून कौतूक करण्यात येत आहे. स्पर्धेत उत्तम कामगिरी केल्यामुळे प्रमाणपत्र आणि चषक देवून स्वरांशचा सत्कार करण्यात आला.

=====================================================

  • मागील इतर बातम्यांचाही मागोवा