एन.एस.यु.आय. ची विद्यार्थी तक्रार निवारण मोहीम

ठाणे,19 डिसेंबर 2016 /AV News Bureau:

ठाणे जिल्हा एन.एस.यु.आय. च्या वतीने  महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या विविध समस्या सोडविण्यासाठी पाच दिवसांची विद्यार्थी तक्रार निवारण अभियान मोहीम आयोजित करण्यात आली होती. नवी मुंबई कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष दशरथ भगत व ठाणे लोकसभा युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष निशांत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे जिल्हा एन.एस.यु.आय. चे उपाध्यक्ष मनोज महाराणा यांच्या नेतृत्वाखाली १७ डिसेंबरपासून पाच दिवसांची विद्यार्थी तक्रार निवारण मोहीम  ठाणे विभागात पार पडली.

विद्यार्थी तक्रार निवारण अभियानाच्या पाचव्या दिवशी ठाणे विभागातील जोशी-बेडेकर महाविद्यालय, NKT महाविद्यालय व आर.जे.ठाकूर महाविद्यालयातील प्रचार्यांसोबत विद्यार्थ्यांच्या तक्रारीसंदर्भात एन.एस.यु.आय. शिष्टमंडळाची  चर्चा झाली. या चर्चेवेळी कॉलेज गेट समोरील होणाऱ्या स्टंटबाजी, मुलींच्या छेडछाडीचे वाढते प्रकार, व्यसनास बळी पढणारी युवा पिढी या समस्येस आळा घालणे आदी मुद्यांवर चर्चा करण्यात आली.

या अभियानाची अंतिम मोहीम ठाणे शहरातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांना भेट देऊन करण्यात आली. तसेच या अभियानामार्फत उत्पन्न झालेल्या समस्यांचा ठाणे जिल्हा एन.एस.यु.आय. कडून पुन्हा २०१७ च्या सुरुवातीस पाठपुरावा करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या हिताकरिता हि मोहीम राबवत असल्यामुळे आम्ही सहकार्य करू” असे संबंधित महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी सांगितले.

या अभियानांतर्गत ठाणे जिल्हा एन.एस.यु.आय. ने पाच दिवसात तब्बल २०-२५ विद्यालय तथा महाविद्यालयांच्या प्राचार्यांना भेट देऊन तेथील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या वेळी ठाणे जिल्हा एन.एस.यु.आय. सरचिटणीस- कु. ओमकार कोल्हे, सरचिटणीस-कु. सागर जगताप, सरचिटणीस- अर्चना कुंभार, ऐरोली विधानसभा अध्यक्ष- कु. आकाश घाडगे, बेलापूर विधानसभा अध्यक्ष- कु. सुरज पवार, समन्वयक सोशल मिडिया नवी मुंबई जिल्हा कॉंग्रेस कु. कुमार नाईकवाडी, उपाध्यक्ष ऐरोली विधानसभा कु. सुमित जगदाळे, निशा धोत्रे, अजित भैरवकर, फारुख शेख, अमित कनौजिया, सिद्धेश माणगावकर, सलमान आदी पदाधिकाऱ्यांनी या अभियानाकरिता अधिक मेहनत घेतली.